चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा मागणी
परभणी (Revenue Servants Strike) : पाथरी येथील महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या आवाहनानुसार पाथरी तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी सोमवार २२ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला पाठिंबा देत सुरुवात केली आहे. (Revenue Servants Strike) महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
पाथरी तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व महसूल सेवक या आंदोलनात सहभागी झाले असून (Revenue Servants Strike) महसूल सेवक नसल्यामुळे गावस्तरावरील ई-पिक पाहणी, महसूली कामकाज तसेच महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनामुळे (Revenue Servants Strike) महसूल विभागाशी संबंधित विविध कामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून शेतकरी व नागरिकांची गैरसोय ही होणार आहे. दरम्यान महसूल सेवक संघटनेच्या सोमवार २२ सप्टेंबर रोजी पाथरीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानुसार, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.