नवी दिल्ली(New Delhi):- यंदा देश गुरुवारी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) एक दिवस आधी बुधवारी सरकारने राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. पोलीस(Police), अग्निशमन(Fire), होमगार्ड(Home)आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 1037 जवानांना यावर्षी शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात येणार आहेत. सरकार दर वर्षी अदम्य शौर्य आणि जीवन आणि मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्याच्या अतुलनीय शौर्याच्या कृतीच्या आधारावर राष्ट्रपती पदक आणि शौर्य पदक प्रदान करते.
A list of Awardees of President's Medal for Distinguished Service/Medal for Meritorious Service on the occasion of Independence Day 2024. pic.twitter.com/OIBwBMwTdS
— ANI (@ANI) August 14, 2024
गृह मंत्रालयाने जाहीर केली नावे
गृह मंत्रालयाने पदक मिळविणाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. एडीजी सुवेंद्र कुमार भागल, डीआयजी कल्पना सक्सेना, इन्स्पेक्टर सुगंधा उपाध्याय आणि उत्तर प्रदेशचे एसआय रामवीर सिंग यांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग 11व्यांदा तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार आहेत.