तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात!
कन्हान (Independence Day) : शहर विकास मंचच्या वतीने 79 व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त गांधी चौक येथे भारतीय सेवानिवृत्त आणि कर्तव्यावर असलेल्या सैनिकांचा (Soldiers) सोहळ्यासह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक जयावंत गटपाडे, प्रमुख अतिथि मंच चे मार्गदर्शक भरत सावळे, सेवानिवृत्त सैनिक श्रवण चव्हाण, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, कन्हान ग्रामिण पत्रकार संघाचे सचिव सुनिल सरोदे, माजी नगरसेवि का राखी परते यांच्या हस्ते भारत माता, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रप ति शिवाजी महाराज, माजी सैनिक स्वर्ग. शामरावजी सावळे, शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करित तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिवसावर मार्गदर्शन करुन स्वातंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त सैनिक विशाल देऊळकर यांनी सेनांच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नागरिक बहु संख्येने उपस्थित!
सेवानिवृत्त सैनिक श्रवण चव्हाण, नरेश गभणे, अमित राऊत, मुकेश सोनेकर, सम्राट पगारे, नितिन महाजन, कर्तव्यावर असलेले सैनिक नितेश गभणे, आशिष सोनी, अनिल सोनेकर यांचा आणि शहिद प्रकाश देशमुख यांचा आई लीलाबाई देशमुख, भाऊ प्रदीप देशमुख, पत्रकार सुर्यभान फरकाडे, सुनिल सरोदे यांचा शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी शाॅल आणि वृक्ष देऊन सत्कार केला. भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन, चिरायु हो, वंदे मातरम् चा जयघोष करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले. याप्रसंगी ताराचंद निंबाळकर, प्रभाकर रुंघे, विठ्ठल मानकर, भरत पगारे, जेष्ठ पत्रकार कमल यादव, मोहन रंगारी, रविंद्र दुपारे, कँप्टन सतिश बेलसरे, प्रदीप देशमुख, नारायण गजभिये, लक्ष्मण वाझे, माहेर इंचुलकर, सौरभ गावंडे, अभिषेक साखरे, निखिल मेश्राम, साहिल सैय्यद, शुभम बावनकर अनुराग महल्ले, कृणाल राजपुत, मुकुल शिवरकर, लोकेश दमाहे, अर्जुन पात्रे, नाना ऊकेकर, अभय ऊके, रुजल मेश्राम, ऋषी देशमुख, जया हिवसे, राज कुमार पटले, सुरज वरखडे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.