पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी!
जम्मू-काश्मीर (India-Pakistan) : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी गोळीबारामुळे (Pakistani Firing) प्रभावित झालेल्या लोकांची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (CM Omar Abdullah) यांनी भेट घेतली आणि त्यांचे दुःख वैयक्तिक असल्याचे सांगितले. स्थानिक लोकांनी जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई मागितली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बुधवारी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी (Uri) येथील सलामाबाद भागात पोहोचले, जिथे पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे लोक प्रभावित झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.
सीमेपलीकडून जास्तीत-जास्त सामान्य लोकांना याचा धोका!
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, गेल्या 2-3 दिवसांपासून नागरी भागात क्रूर गोळीबार सुरू आहे. असे वाटत होते की, सीमेपलीकडून जास्तीत-जास्त सामान्य लोकांना (Ordinary People) याचा धोका निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. आता युद्धबंदी (Prisoner of War) आहे. दोन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर शांतता आहे. ज्या घरांचे नुकसान (Damage Houses) झाले आहे. त्या सर्व घरांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चला नुकसानीचा आढावा घेऊ आणि मदत देण्यास सुरुवात करूया. काम सुरू झाले आहे, काही दिवस लागतील. पण आम्ही लोकांना त्यांच्या पायावर उभे करू.