मानोरा (Farmer crops) : खरीप हंगामात शेतात बहरत असलेल्या पिकावर हुमनी अळी कोवळ्या पिकावर आक्रमण करीत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हुमनी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या (Farmer crops) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन देखील पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला विलंब झाला. पेरणीची वेळ जात असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेगाने सुरुवात केली. त्यानंतर पाऊस रुसल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. कसेबसे वरुण राजाची कृपादृष्टी होवून पावसाच्या सरी कोसळल्याने पिके जमिनीतून बाहेर पडली. आता पिके बहरत असताना हुमणी अळीच्या प्रादुर्भावाचे संकट शेतकऱ्यावर कोसळले आहे.
नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसून यंदाही खरीप हंगामातील कोवळी (Farmer crops) पिके शेतात डोलत असताना कपाशी व सोयाबीन पिकावर हुमनी अळीचे आक्रमण दिसून येत आहेत. हुमनी अळी कोवळे पानाला कुरतडून खातात. यामुळे उत्पादनात कमालीची घट होते. या अळीवर वेळीच उपाययोजना करण्याकरिता कृषी विभागाने उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.