धनश्री प्रतिष्ठान आयोजित आंतरराष्ट्रीय लावणी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न पुढील वर्षी
तीन दिवसीय लावणी महोत्सवाचे आयोजन
अमरावती (International Lavani Competition) : धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान द्वारा आंतरराष्ट्रीय लोकधारा लावणी नृत्य स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. उत्कृष्ट नृत्यासाठी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते. ही लोककला रुजावी व वाढावी यासाठी धनश्री प्रतिष्ठान वतीने मागील चार वर्षा पासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर रोडवरील जिजाऊ प्रतिष्ठान, मराठा नगरी, रहाटगांव येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (International Lavani Competition) स्पर्धेचे उद्घाटन अश्विन चौधरी अध्यक्ष जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रा. स्मिता देशमुख प्राचार्य विमलाबाई देशमुख महाविद्यालय तर विशेष अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयुराताई देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आडे, शोभना देशमुख,चंद्रकांत पोपट,निशी चौबे,तर सत्कारमूर्ती म्हणून प्रकाश राऊत,सतीश यादव, अर्चना सवाई यांची उपस्थिती होती. (International Lavani Competition) एकूण स्पर्धेत ठसकेबाज लावण्या आणि दिलखेचक अदांनी रसिकांची मने जिंकली. यामध्ये वयोगट ५ ते १४ मधील स्पर्धकांपैकी प्रथम बक्षीस अनुक्रमे संयुक्ता ढवळे, स्वरा वैरागडे, द्वितीय अनुक्रमे विधिषा खोयांडे, समन्विता ठाकरे,, तृतीय अनुक्रमे लावण्या आगलावे ,योगण्या वासेकर आणि प्रोत्साहनपर परिणीती मांडले, नूतन गावंडे,ईश्वरी आखरे,श्रावणी मुळे,रीतिषा चौधरी, कर्तव्या धानोरकर, आराध्या डुंबरे, अद्विका राऊत,साची भुसारे यांना मिळाले.
१५ ते २५ वर्षे वयोगटातून प्रथम बक्षीस जास्मिन शेख, द्वितीय अनुक्रमे वैष्णवी साखरकर, उर्वशी पलंडू कर,,तृतीय अनुक्रमे श्रेया मोटघरे, भैरवी भोय, यांना, तर ग्रुप खुला गट मध्ये प्रथम गुरुकुल डान्स अकॅडमी वणी, द्वितीय पुरस्कार ब्लॉसम डान्स अकॅडमी नागपूर, तृतीय अनुक्रमे नटराज नृत्यपुरुष साधना केंद्र यवतमाळ, पिडीये ग्रुप वर्धा तसेच खुला गट मध्ये प्रथम आकाश तायडे , द्वितीय जय कैथवास ,तृतीय अनुक्रमे पार्थ कोहळे, हर्षद खान यांना पुरस्कार देऊन गौरविण्यातआले महाराष्ट्रातील नांदेड, चंद्रपूर, छ.संभाजी नगर ,अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूरसह विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होऊन रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी नृत्यांना भरभरून प्रतिसाद दिला. (International Lavani Competition) स्टेजवरील बहारदार लावणीने वातावरण अधिकच रमणीय झाले होते.
परीक्षक म्हणून आकाश बिजवे,श्यामली पांडे, अंबू सेदानी उपस्थित होते. याप्रसंगी मराठा उद्योजग क क्षाचे अनिल टाले,कांचन उल्हे,मराठा सेवा संघाचे मनोहर कडू,प्रफुल गुडधे, संभाजी ब्रिगेडचे चे मनीष पाटील, विविध संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली भविष्यात तीन दिवसीय लावणी महोत्सव आयोजित करण्याचे जाहीर केले. (International Lavani Competition) लावणी स्पर्धेचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी केले.तर प्रास्ताविक धनश्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा स्पर्धेच्या आयोजक मंजु ठाकरे, यांनी केले आरती बोंदरकर, कुंदा पुसतकर, सुचित्रा लहाने, शारदा विधळे, पल्लवी पांडे, ज्योती हजारे, पल्लवी बावस्कर, ऐश्वर्या मडघे, अपर्णा वाकोडे, सीमा थूले, पूजा रडके, स्वाती काळे, विजया काळे, आदींनी परिश्रम घेतले.
या (International Lavani Competition) स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाला मालाबार गोल्ड अँड डायमंड, रघुवीर ग्रुप, मॉडन इलेक्ट्रॉनिक्स, कॉटन किंग, शिवानी अर्थ अँड मुव्हरस, जयदेव मल्टीपर्पस कंपनी, साई कोचिंग क्लासेस, यशंजली कंट्रक्शन, आरोग्यम स्वस्त औषधी सेवा जेनरिक औषधे, हायटेक ऍग्रो सोल्युशन, सूश आश्रय वेल्फेअर फाउंडेशन, अच्युतम फ्रुटम इत्यादी प्रायोजकांनी धनश्री प्रतिष्ठानच्या आंतरराष्ट्रीय लावणी स्पर्धेला आपले सहकार्य, योगदान दिले.