नवी दिल्ली (IPL 2025 Shreyas Iyer) : पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आयपीएल 2025 च्या सामन्यात श्रेयस अय्यरने इतिहास रचला. तो (IPL 2025) आयपीएलच्या इतिहासात 3 वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये नेणारा पहिला कर्णधार बनला आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) आधी आयपीएलच्या इतिहासात इतर कोणत्याही कर्णधाराने हा चमत्कार केला नव्हता.
पंजाबने प्लेऑफमध्ये केला प्रवेश
पंजाब किंग्जने (Punjab Kings) राजस्थानचा 10 धावांनी पराभव करून, यावर्षीच्या (IPL 2025) प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले. नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्या शानदार अर्धशतकांनी पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे संघाला एक मजबूत धावसंख्या उभारता आली. यासोबतच हरप्रीत ब्रारने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांवर दबाव राहिला. या शानदार कामगिरीमुळे, पंजाब किंग्जने (IPL 2025) आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
श्रेयस अय्यरने केला मोठा विक्रम
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आयपीएल 2025 मध्ये एक नवा विक्रम रचला आहे. तो तीन वेगवेगळ्या (IPL 2025) आयपीएल संघांना प्लेऑफमध्ये नेणारा पहिला कर्णधार बनला. ही कामगिरी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करताना हे केले नव्हते. श्रेयस अय्यरने 2019 आणि 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले, त्यानंतर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले आणि आता 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींचे नेतृत्व करणारा पाचवा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि अजिंक्य रहाणे यांनी ही कामगिरी केली होती. परंतु यापैकी फक्त अय्यर आणि संगकारा असे खेळाडू आहेत. ज्यांनी या तीन संघांचे पूर्णवेळ नेतृत्व केले.
पंजाबचा राजस्थानविरुद्ध दमदार विजय
पंजाब किंग्जने (Punjab Kings) शानदार फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर 219 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्या वादळी अर्धशतकी खेळींमुळे संघ मजबूत झाला. नेहलने 70 धावांची शानदार खेळी केली, तर शशांकने 59 धावांसह नाबाद राहून संघाची धावसंख्या 219धावांपर्यंत पोहोचवली. (IPL 2025) राजस्थान रॉयल्स संघाला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या.