Akola :- दिनांक 13 सप्टेंबर तालुका प्रतिनिधी बार्शी टाकळी. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे, मजुरांना रोजगार मिळावा, या हेतूने शासनाने झालेली जलयुक्त शिवार योजनेची कामे, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. असे मत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लखन गावंडे यांनी व्यक्त केले.
शिवार योजनेची कामे, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत
बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड परिसरातील जलयुक्त शिवार योजनेची कामे पाहण्याकरिता शनिवार दिनांक 13 सप्टेंबरला भारतीय जनता पार्टीचे विधानसभा (Assembly) प्रमुख राजू पाटील काकड, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. मधुकरराव पवार, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस लखन गावंडे, मंडळ अध्यक्ष गोपाल महल्ले, सौरभ अग्रवाल, ज्येष्ठ पदाधिकारी गणेश मते, सुधाकर महल्ले, विठ्ठल वाघ, प्रवीण धाईत, माजी सरपंच शिवा पाटील कावरे, योगेश कोंदणकर, दत्ता साबळे, सचिन भटकर,अनंत केदारे यांचे सह अनेक जण उपस्थित होते. पुढे बोलताना गावंडे म्हणाले की, मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील विविध भागात शेततळे, सिमेंट नालाबाध, नाला खोलीकरण, मला सरळीकरण, ढाळीचे बांध ,तलाव व वृक्ष लागवड अशा प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली आहे.
त्यातील सिमेंट नाला बांधाची कामे सुद्धा तालुक्यातील विविध भागात झाली आहेत. तालुक्यातील अनेक भागात तसेच या परिसरात काही दिवसापासून सतत पाऊस चालू असल्याने सिमेंट नाला बांधामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बागायती व रब्बी पिके घेण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याने सदर कामेही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहेत. असे मत सदर कामाची पाहणी केल्यानंतर दैनिक देशोन्नतीशी (Deshonnati)बोलताना व्यक्त केले.