महाराष्ट्राला समृद्ध बनविण्यासाठी वसंतरावजी नाईक यांचा मोठा वाटा!
रिसोड (Jayanti Celebrations) : हरित क्रांतीचे (Green Revolution) प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former CM Vasantrao Naik) यांची जयंती. 1 जुलै ही जयंती कृषीदिन (Agriculture Day) म्हणून साजरी केली जाते. राज्याचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. अश्या या महानायक वसंतरावजी नाईक यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली.यासोबतच स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा चे संस्थापक अध्यक्ष स्व. माणिकराव जाधव (Manikrao Jadhav) यांची सुद्धा जयंती शाळेत साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वसंतरावजी नाईक व माणिकराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून हार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले!
या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी (Students) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी वसंतरावजी नाईक व माणिकराव जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून शिक्षक व विद्यार्थी यांची समायोचित भाषणे संपन्न केली. यासोबतच शाळेतील शिक्षकांनी सुद्धा वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांचा दाखला देत त्यांचा गौरव केला. तसेच स्वर्गीय माणिकराव जाधव यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण (Education) देण्यासाठी इंग्रजी शाळेची स्थापना करून समाजासाठी मोलाचा वाटा उचलला आज जवळपास शाळेला 7 वर्ष पूर्ण झाली आहे. अजून ही शैक्षणिक प्रक्रिया नियमितपणे सुरु आहे. याबद्दल त्यांच्या कामाचा सुद्धा गौरव या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष विनायक जाधव संचालक मंडळाच्या वतीने सीमा मापारी प्राचार्य हर्षल वासेवाल, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.