हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Police) : शहरातील रिसाला बाजारमध्ये स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन भामट्यांनी शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एका व्यापार्यास पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्या अंगावरील सोन्याची अंगठी व सोनसाखळी पळविल्याची घटना घडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Hingoli Police) हिंगोली शहरातील यशवंत नगर भागातील गिरीष रुखोबा यरमळ हे व्यापारी २१ जून रोजी दुपारच्या सुमारास आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या घरी जेवणाकरीता मोटर सायकलवरून जात होते.
याच वेळी रिसाला बाजार भागातील गणेशवाडी शाळेसमोर स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन भामट्यांनी यरमळ यांना तुम्हाला बर्याच वेळापासून आवाज देत आहोत, काल या ठिकाणी गांजा ची झाली असून त्यामध्ये एका व्यक्तीला चाकू लागला आहे. तुम्ही अंगठी व चैन घालून का जात आहात, सदर दागिने काढून ठेवा आम्ही पोलिस (Hingoli Police) आहोत असे म्हणून यरमळला त्यांनी सांगितले. यरमळ यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची साखळी काढली. याच वेळी भामट्यांनी रुमालामध्ये अंगठी व चैन ठेवल्याचे दाखवत रुमालाची घडी करून यरमळ यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिली. त्यानंतर भामट्यांनी घटनास्थळावरून पाय काढता घेतला.
काही वेळात भामटे निघून जाताच यरमळ यांना शंका आल्याने त्यांनी मोटर सायकलची डिक्की उघडून रुमाल पाहिल्यावर त्यात १० रुपयाचे नाणे दिसून आले. यावरून आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिल्याने दोन अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Hingoli Police) हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्यासह सपोनि संगमनाथ परगेवार, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्वेâ, विलास वडकुते यांच्या पथकाने घटनास्थळी जावून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहणी केल्यावर स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या दोघांनी तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस या भामट्यांचा शोध घेत आहेत.