अपघाताची शक्यता वाढलेली!
कोरेगाव, चोप (Construction Work) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ते एकलपूर, वडसा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजने (CM Gram Sadak Yojana) अंतर्गत देखभाल व दुरुस्ती रस्त्याची करार संपताच कोरेगाव शेजारील एका मोरी पुलाची तुटल्याने अपघाताची शक्यता वाढलेली आहे.
दुर्लक्ष केल्याने, वाहतुकीमुळे हा रस्ता फुटत गेला!
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्र .रा. मार्ग 11 ते कोरेगाव रस्ता 11 – 8 -2018 ला काम सुरू झाला. या कामाची मूळ किंमत 303.66 लाख एवढी होती. या कामाची एकूण लांबी 7.800 km एवढी होते. या कामात डांबरीकरण रस्ता 1.400 किलोमीटर कांक्रीट 400 मीटर मोरी बांधकाम 8 नाली बांधकाम 155 मीटर होता हे काम 10-2 -2019 रोजी पूर्ण झाले व त्याची देखभाल दुरुस्ती ही 5 वर्षाकरिता म्हणजे 1 – 2 – 2024 पर्यंत होती, 2024 मध्येच कोरेगाव शेजारील एक मोरी तुटली परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने, वाहतुकीमुळे हा रस्ता फुटत गेला आणि एन पावसाळ्यातच (Rainy Season) मुख्य ठिकाणी मधोमध 2 ठिकाणी भगदाड (Stampede) पडले आहे.
रात्रीच्या वेळी प्रवासासाठी घातक ठरु शकते!
वळणावर ही मोरी असल्याने मोरी दिसून येत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवासासाठी घातक ठरु शकते, तर या रस्त्याने शेतकरी वर्ग आपले जनावरे शेताकडे व चारण्यासाठी नेत असतात. त्यामुळे या भगदाडात जनावराचे पाय जाऊन तुटण्याची शक्यता वाढलेली आहे. जर देखभाल व दुरुस्तीच्या काळातच या तुटत असलेल्या मोरी कडे लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती आज उद्भभलेली नसती. असे नागरिकांचे म्हणणे आहे. कंत्राटदाराबद्दल (Contractor) रोष निर्माण होत आहे, जर कदाचीत अनुचित घटना घडली, तर जबाबदार कोण? असाही सवाल कोरेगाव येथील नागरिक करीत आहेत. हे भगदाड दुरुस्त करण्यात यावी याची मागणी कोरेगाव वासीयांनी केली आहे.