रांची (Jharkhand Cabinet Minister) : हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या सहा दिवसांनी आज गुरुवारी (05 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. हेमंत सोरेन मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांनी आज राजभवनाच्या (Jharkhand Cabinet) अशोक उद्यानात शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
Ranchi, Jharkhand | Congress MLA Radha Krishana Kishore, JMM MLA Deepak Birua, JMM MLA Chamra Linda and RJD MLA Sanjay Prasad Yadav take oath as Ministers in the JMM-led Mahagathbandhan Government in the state. pic.twitter.com/BXU7ozCGcx
— ANI (@ANI) December 5, 2024
हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या नव्या सरकारमध्ये पुन्हा 5 मंत्र्यांची पुनरावृत्ती झाली आहे. तर JMM आणि काँग्रेसने 50 टक्के मंत्री बदलले आहेत. JMM आमदार स्टीफन मरांडी, JMM आमदार दीपक बिरुआ, JMM आमदार चमरा लिंडा, JMM आमदार रामदास सोरेन आणि JMM आमदार हफीझुल हसन यांनी JMM नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर (Jharkhand Cabinet) काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण किशोर, काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी आणि आरजेडीचे आमदार संजय प्रसाद यादव यांनी शपथ घेतली आहे.
Ranchi, Jharkhand | JMM MLA Ramdas Soren, Congress MLA Irfan Ansari, JMM MLA Hafizul Hasan and Congress MLA Dipika Pandey Singh take oath as Ministers in the JMM-led Mahagathbandhan Government in the state. pic.twitter.com/46PTFLlabh
— ANI (@ANI) December 5, 2024
हेमंत सोरेन मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी
1. राधाकृष्ण किशोर- काँग्रेस
2. दीपक बिरुआ- JMM
3. चमरा लिंडा- JMM
4. संजय प्रसाद यादव- राजद
5. रामदास सोरेन- JMM
6. इरफान अन्सारी- काँग्रेस
7. हफीझुल हसन- JMM
8. दीपिका पांडे सिंग- काँग्रेस
9. शिल्पा नेहा टिर्की- काँग्रेस
10. योगेंद्र प्रसाद- JMM
11. सुदिव्य कुमार सोनू- JMM