Ghatanji :- महापुर आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या न्यायहक्कांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ घाटंजी येथे आयोजित करण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील विविध गावांतील शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशासन आणि शासनाकडे आपला रोष व्यक्त केला.
घाटंजीत काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये:
1. दुष्काळग्रस्त क्षेत्रांची तातडीने घोषणा करणे शेतकर्यांचे संपूर्ण कर्जमाफ करणे
2. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना प्रती हेक्टर ५०,००० रू अनुदान देणे
3. मजूर वर्गासाठी रोजगार उपलब्ध करणे
4. सर्व शेतकर्यांना सरसकट पिकविमा देणे
5. सोयाबीनला ७,००० रू व कापसाला १०,००० रू प्रतिक्विंटल असा हमीभाव देण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय अतिक्रमित घरकुल लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे, घरकुल नसलेल्यांसाठी शासनाने जागा उपलब्ध करावी, अल्पसंख्याक घरकुल योजना त्वरीत मंजूर करावी, जंगली जनावरांच्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, शेतपांधन रस्ते दुरुस्त करावेत आणि कृषी पंपांची वीजजोडणी तत्काळ सुरू करावी, अशा विविध मागण्या मोर्चात मांडण्यात आल्या. शेतकरी(Farmer) संघटनांनी सरकारला इशारा देत सांगितले की – ‘शेतकर्यांना सातबारा कोरा करून दिलासा द्या; अन्यथा पुढील तीव्र आंदोलनासाठी तयार राहा!’ या मोर्चात लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, नेते आरिज बेग, तसेच घाटंजी, पांढरकवडा आणि आर्णी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.