परभणीतील जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील घटना
आरोपीमध्ये महिला पोलिसाचा समावेश…!
परभणी/जिंतूर (Jintur Crime Case) : मालेगाव शिवारातील जमिनीची स्वच्छता करत असताना आरोपींनी संगणमत करत एकाला ही जमीन आमची आहे, तु का स्वच्छता करत आहेस, असे म्हणत अश्लिल शिवीगाळ करत जबर मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मालेगाव शिवारात घडली. या प्रकरणी (Jintur Crime Case) जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिला पोलीस कर्मचार्याचाही समावेश आहे.
किशन सखाराम आडे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मालेगाव येथे गट क्रमांक ६८ मधील जागेवर साफसफाई करत होते. यावर आरोपींनी ही जागा आमची आहे, तु का स्वच्छता करतो, असे म्हणाल्यावर फिर्यादीने जागा माझ्या नावावर आहे, माझ्याकडे कागदपत्र आहेत, असे उत्तर दिल्यानंतर आरोपींनी संगणमत करत फिर्यादीला मारहाण करुन जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. या (Jintur Crime Case) प्रकरणी सुनीता राठोड, नितीन राठोड, आशिष राठोड, अहिल्याबाई राठोड यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. शिराळकर करत आहेत.