जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथे कारवाई
परभणी/जिंतूर (Jintur Crime) : तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दित बुधवार ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास रायखेडा येथे कारवाई करत पोलिसांनी ४ लाख १३ हजार २८० रुपयांचा अवैध दारु साठा जप्त केला आहे. आरोपीने शेतामध्ये दारु लपवून ठेवली होती. या (Jintur Crime) प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतात लपवून ठेवली होती दारु
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. सुनील अंधारे, पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, अजीत बिरादार व इतर अंमलदार यांच्या पथकाने कारवाई केली. (Jintur Crime) पोलिसांच्या पथकाला रायखेडा येथे शेतातील घराच्या समोर पत्र्याच्या शेडमध्ये तसेच सोयाबीनच्या भुशात दारु लपवून ठेवलेली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून अवैध दारु जप्त केली. तसेच राजु तुकाराम जाधव याला ताब्यात घेतले. संबंधिताला पुढील कारवाईसाठी चारठाणा पोलिसात हजर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २२ गुन्ह्यांची नोंद
परभणी : परभणी पोलिांच्या वतीने अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विविध (Jintur Crime) पोलीस ठाण्यात कारवाई करत २२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपींजवळून हजारो रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कारवाया करण्यात येत आहेत.




 
			 
		

