परभणीच्या जोगवाडा- सोस परिसरात अतिवृष्टी
परभणी/जिंतूर (Jintur Heavy rain) : तालुक्यातील जोगवाडा – सोस परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस (Cloudburst rain) झाला. ओढ्याच्या बाजुला असलेल्या शेत जमीनीवरील शेती पिके खरडून गेली आहेत. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यां मधून होत आहे.
पंचनामे करण्याची शेतकर्यांची मागणी
यावर्षी तालुक्यात जून महिन्यात वेळेवर पाऊस (Heavy rain) झाला. शेतकर्यांनी महागडी बियाणे, खते खरेदी करुन पेरण्या केल्या. वेळेवर पाऊस झाल्याने शे पीक देखील जोमात होते. जोगवाडा, सोस, सोनापुर, गारखेडा, राजेगाव, भांबरी, मानकेश्वर शिवारात सोमवारी (Cloudburst rain) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचले. सोयाबीन, कापूस, तुर आदी पिके पाण्याखाली गेली. शिवाय ओढे नाल्यांना पाणी आल्याने हे पाणी शेतात शिरले. पाण्याच्या प्रवाहाने शेत जमीन खरडुन गेली. यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकर्यां मधून होत आहे.