जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात प्रक्रिया सुरु
परभणी/जिंतूर (Jintur-Selu Assembly Elections) : जिंतूर सेलू मतदार संघात ८० प्लस आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष पथकाद्वारे गृह मतदान प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ८८ वर्षीय एका महिलेने गृह मतदानाचा आपला हक्क बजावला आहे.
जिंतूर सेलू विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या (Jintur-Selu Assembly Elections) अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही. अशा ८५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून गृह मतदान करून घेणार आहे यासाठी २० मतदान पथकामार्फत सेलू जिंतूर तालूक्यातील एकूण 901 मतदारांच्या घरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेतले जाणार आहे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जिंतूर व सेलू तालुक्यातील ८५ प्लस व दिव्यांग व्यक्तीचे टपाली मतदानास सुरुवात झाली आहे.
जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात (Jintur-Selu Assembly Elections) ८५ वर्षा पेक्षा ज्यास्त वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी 1१४ व १५ नोव्हेंबर रोजी ग्रह मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे म्हणून मतदारांनी दिलेल्या दिवशी घरी थांबवून आपला मतदानाचा हक्क बाजवावा.
– प्रवीण फुलारी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी