नैसर्गिक आपत्ती काळात संस्थेचे अविरत कार्य सुरु
हिंगोली (Jivala organization) : इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार व आयएसओ मानांकन प्राप्त (Jivala organization) जिव्हाळा संस्था यांच्या पुढाकाराने व गुंज संस्था, दिल्ली च्या सहकार्याने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदतकार्याची सुरुवात करण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीमध्ये शेकडो कुटुंबांचे घरे, शेती, जनावरे व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान होऊन अनेक कुटुंबे बेघर व संकटात सापडली. या कठीण प्रसंगी (Jivala organization) जिव्हाळा संस्था आपत्तीग्रस्त नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. जिव्हाळा संस्थे च्या सचिव रोहिणी अलमुलवार यांच्या हस्ते कुरुंदा ता. वसमत या गावांमध्ये मदत वितरणाचा शुभारंभ झाला.
या उपक्रमा अंतर्गत ६२ हून अधिक कुटुंबांना फॅमिली किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये कपडे, बूट-चप्पल, सतरंजी, भांडी, ताडपत्री, तांदूळ, तूर दाळ तसेच गृहउपयोगी साहित्याचा समावेश होता. या मदतीमुळे शेकडो कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळून त्यांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुलले. जिव्हाळा संस्थेचे च्या सचिव रोहिणी अलमुलवार म्हणाल्या कि जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली (Jivala organization) जिव्हाळा संस्था हिंगोली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये अविरत मदतकार्य करीत आहे.
गुंज संस्था, दिल्ली यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच ही मदत शक्य झाली. (Jivala organization) संस्थेच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळेच हा उपक्रम यशस्वी ठरला.’ या अभियानात गुंज संस्थे चे प्रशांत रणदिवे, जिव्हाळा संस्थेचे स्वयंसेवक रोहित अलमुलवार, आदींनी मोलाचे योगदान दिले.