देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jnantirtha Youth Festival: ज्ञानतीर्थ युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Jnantirtha Youth Festival: ज्ञानतीर्थ युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान!
नांदेडमराठवाडा

Jnantirtha Youth Festival: ज्ञानतीर्थ युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/08 at 4:39 PM
By Deshonnati Digital Published October 8, 2025
Share
Jnantirtha Youth Festival

दीड हजार युवक-युवती यात आपली कला सादर करणार!

नांदेड (Jnantirtha Youth Festival) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ २०२५ येत्या १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी येथे संपन्न होणार आहे. या युवक महोत्सवामध्ये चार जिल्ह्यातील ८५ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला असून सुमारे दीड हजार युवक-युवती यात आपली कला सादर करणार आहेत.

सारांश
दीड हजार युवक-युवती यात आपली कला सादर करणार!कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण!उद्घाटन सत्रापुर्वी घेण्यात येणारी शोभायात्रा रद्द!वादविवाद स्पर्धा आयोजित!

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण!

१२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर माननीय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ साध्या पद्धतीने पार पडेल. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता पारितोषिक वितरण (Distribution of Prizes) व समारोप सोहळा मा. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. सहभागी विद्यार्थी कलावंतांना सादरीकरणासाठी पाच मंच तयार करण्यात येत असून, युवक महोत्सव परिसराला शिवरामजी पवार नगरी असे नाव देण्यात आले आहे. मंच क्रमांक एकला क्रांतिवीर बिरसा मुंडा, मंच क्रमांक दोनला डॉ. श्रीराम लागू , मंच क्रमांक तीनला पद्मश्री मोहम्मद रफी, मंच क्रमांक चारला साहित्यिक भास्कर चंदनशिव आणि मंच क्रमांक पाचला चित्रकार वासुदेव गायतोंडे अशी नावे देण्यात आली आहेत.

उद्घाटन सत्रापुर्वी घेण्यात येणारी शोभायात्रा रद्द!

‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या सारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या ऐवजी केवळ कलेची स्पर्धा म्हणून साधेपणाने आणि काटकसरीने घ्यावा, असे निर्देश माननीय कुलगुरू महोदयांनी दिले आहेत. त्यामुळे उद्घाटन सत्रापुर्वी घेण्यात येणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच स्वागत-सत्काराला फाटा देऊन साधेपणाने आणि काटकसरीने हा युवक महोत्सव घेण्याचे निश्चित झाले आहे.

वादविवाद स्पर्धा आयोजित!

सदरील युवक महोत्सवात ३० कला प्रकारांचा समावेश असून संगीत विभागात शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्चात्य, कव्वाली, इत्यादींचा समावेश आहे. नृत्य विभागात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य इत्यादींचा समावेश आहे. नाट्य विभागात एकांकिका मराठी किंवा हिंदी, विडंबन, मूक अभिनय, नक्कल या कलाप्रकारांचा समावेश आहे. साहित्य विभागामध्ये वाद-विवाद, वक्तृत्व, कथाकथन इत्यादींचा समावेश आहे. ललित कला विभागात चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, मूर्तीकला, मेहंदी, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, कलात्मक जुळवणी इत्यादींचा समावेश आहे. तर लोककला विभागामध्ये पोवाडा, लावणी, लोकसंगीत, प्रबोधनात्मक जलसा इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रोजगारभिमुख आहे /नाही या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी १) राष्ट्र जडणघडणीत युवकांची भूमिका, २) जनआंदोलने आणि भारतीय लोकशाही, ३) कृत्रिम बुद्धिमता : संधी आणि आव्हाने, ४) वृक्षसंवर्धन काळाची गरज हे चार विषय ठेवण्यात आली आहेत.

या पत्रकार परिषदेस कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी संबोधीत केले. त्यांच्या समवेत व्यासपीठावर प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे प्राचार्य डॉ. विजय पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्र.संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

You Might Also Like

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

Girls Harassment: परभणीत आई, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा!

TAGGED: Distribution of Prizes, Jnantirtha Youth Festival
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kalmanuri Assembly Elections
मराठवाडाराजकारणहिंगोली

Kalmanuri Assembly Elections: निवडणुकीत वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार?

Deshonnati Digital Deshonnati Digital November 21, 2024
Gangakhed Police: आता गावाच्या सुरक्षेसाठी गावागावात बसविणार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’
New Delhi: मनाला प्रसन्न करणारी ‘ही’ वारसा स्थळे!
CM Youth Work Training Yojana: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये १ हजार ६६८ उमेदवारांची निवड
Parbhani : अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा; मोर्चेकर्‍यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना केले सादर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
NCP Election
मराठवाडाहिंगोली

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

October 20, 2025
Aundha Nagnath
मराठवाडाअध्यात्महिंगोली

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

October 20, 2025
Meghna Bordikar
परभणीमराठवाडा

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?