परभणी/गंगाखेड (Parbhani) :- स्थानिक गुन्हे शाखा व गंगाखेड पोलीसांनी गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा शिवारातील पांदण रस्त्यावर सोमवार सोमवारी रात्री सातच्या वाजेच्या सुमारास केलेल्या संयुक्त कारवाईत दहा किलो गांजा जप्त केला असुन आरोपी मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे.
दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपी मात्र फरार…?
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील दत्तराव सिताराम केजगीर हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी मनो विकारावर परिणाम करणारे गुंगी कारक हिरवट रंगाचा पाला, काड्या व बीया मिश्रित ओलसर उग्र वास येणारा गांजा (Marijuana) बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, सपोनि राजु मुत्येपोड, जमादार मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, लक्ष्मण कांगणे, परसराम गायकवाड, गजानन क्षिरसागर, दिपक मोदीराज, रफिक शेख, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोउपनि राहुल लोखंडे, जमादार मोती साळवे, शिवाजी बोमशेटे, मपोशि दंडवते आदींनी संयुक्त कारवाई करत सोमवार 5 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास डोंगरपिंपळा येथून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील लक्ष्मीबाई तिडके यांच्या शेताजवळ एमएच 12 जीयु 3569 क्रमांकाच्या दुचाकीसह दोन खताच्या पिशव्यांची तपासणी केली.
दुचाकीसह दोन खताच्या पिशव्यांची तपासणी
त्यात अंदाजे 94,780 रुपये किंमतीचा 9 किलो 478 ग्राम हिरवट रंगाचा पाला काड्या व बिया मिश्रीत ओलसर उग्र वास येत असलेला (अंमली पदार्थ) गांजा किंमत प्रति किलो अंदाजे 10 हजार रुपये व 50 हजार रुपये किंमतीची लाल रंगाची काळा पट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच 12 जी यु 3569 असा एकुण 1 लाख 44 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला. दुचाकीवरील दत्तराव सिताराम केजगीर रा. डोंगरपिंपळा ता गंगाखेड हा मात्र पोलीसांना पाहुन दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजु सायन्ना मुत्येपोड वय 40 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सपोनि आदित्य लोणीकर यांच्या आदेशाने दत्तराव सिताराम केजगीर रा. डोंगरपिंपळा ता. गंगाखेड यांच्याविरुद्ध गुंगी कारक औषधीद्रव्य व मनो विकारावर (mental disorders) परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (एन.डी.पी.एस. अॅक्ट) च्या विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोउपनि राहुल लोखंडे करीत आहे.