पुसद (Farmers Association) : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर सल्फर वाटप न करणाऱ्या निष्क्रिय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तात्काळ जिल्ह्यातून हकालपट्टी करावी महागाव तालुक्यात बोगस खताच्या संदर्भाने जिल्हा कृषी विभागाकडून कृषी केंद्रावर झालेली कारवाई केवळ फार्स व प्रासंगिक देखावा असून या पापात भागीदार असलेल्या कामचुकार व कर्तव्यात दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फ करण्याची कारवाई वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित असताना केवळ कारवाई म्हणून 60 दिवसासाठी परवाना रद्द करणारी कारवाई म्हणजे निव्वळ धुळफेक असून बोगस माती मिश्रित रासायनिक फर्टीलायझर, पि. जी. आर. त्यामुळे अशा थातूरमातूर कारवाईमुळे बोगस खताचा व पेस्टिसाइड कीटकनाशक गोरख धंदा कृषी विभागाच्या आशीर्वादाने तेजीत या जिल्ह्यात चालू आहे.
– शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना
Farmers Association: प्रशासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना न्याय द्यावा- स्वाभिमानी शेतकरी संघटना




