गोंदिया (Gondia) :- मा.सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) 1 ऑगस्ट 2024 ला अनुसूचित जाती आणि जमातीच्या विरोधात दिलेल्या संविधान विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथील एस.सी, एस.टी,ओबीसी व ईतर संघटनेच्या वतीने आज बुधवार 21 ऑगस्ट ला देशव्यापी ‘लढा अस्तित्वाचा’भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत केशोरी गाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
केशोरी गाव बंदचे आवाहन
इतर बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण,रोजगार व नोकऱ्या मिळवून उच्च वर्णीयांची बरोबरी करू पाहत आहे. परंतू हेच या जातीयवादी मानसिकतेला अजीबात मान्य नाही. त्याकरिताच षडयंत्र रचून संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून आरक्षण व हक्क हिरावून देशात खाजगीकरणाद्वारे आरक्षणच संपुष्टात आले आहे. असे मागासवर्गीय संघटनांनी म्हटले आहे. त्यातच आता भरीसभर म्हणून 1 ऑगष्ट ला मा.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण (गट पाडून) आणि क्रिमीलियर सारखी घातक अट लावली असल्याने जाती-जातीत फुट पाडण्याचे असंवैधानिक निर्णय दिले आहे. असे मागासवर्गीय संघटनांना वाटत आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे खुल्या प्रवर्गातील समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल व इतर मागासवर्गीय बहुजन समाज कसा वंचित राहील हाच षडयंत्र आहे.
क्रिमिलीयर सारखी अट द्वी समाजाला घातक ठरेल अशी भिती संघटनांनी व्यक्त केली
क्रिमिलीयर (Krimilier) सारखी अट द्वी समाजाला घातक ठरेल अशी भिती संघटनांनी व्यक्त केली आहे. यामुळे लढा अस्तित्वाचा भारत बंदच्या समर्थनार्थ 21 ऑगस्ट रोजी बुधवारला येथील अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी, गोवारी कृती समिती अर्जुनी/मोरगाव यांनी अर्जुनी/मोरगाव तालुका बंदची हाक दिली होती. यामुळे केशोरी येथे कडकडीत बंद पाडुन मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी बंद मध्ये खाजगी आस्थापणातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आले तर महाविद्यालय, शाळा सुरु ठेवुन शाळेच्या विद्यार्थांना सुट्टी देण्यात आली होती. तर शासकीय कार्यालये,बैंका सुरळीत सुरु होत्या. तर भारत बंदचा फटका वाहतुक बंद असल्याने सर्व सामान्य नागरिकांना तसेच बस व खाजगी प्रवाशांना बसला तर बंद मध्ये भाजीपाला विक्रेते यांनी सहभाग घेतल्याने बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता.
त्यामुळे भारत बंदला केशोरी येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन शंभर टक्के बंद पाळण्यात आला हे विशेष. तर बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी केशोरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी केशोरी येथील चौका-चौकात पोलीस बंदोबस्त लावला होता.




