अयोध्या पौळ यांचा सवाल
हिंगोली (Kalmanuri Assembly Constituency) : चोवीस तासांपूर्वी बावीसशे कोटी रुपये कळमनुरी मतदार संघाला विकासासाठी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मग लोहरा गावचा रस्ता का झाला नाही असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या अयोध्या पौळ यांनी मंगळवारी उपस्थित केला. लोहरा येथील शेतकऱ्यां समवेत पौळ यांनी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली. लोहरा येथील पाझर तलाव फुटून मोठे हजारो एकर जमिन खरडून मोठे नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना २४ तासात मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ते आश्वासन हवेत विरले आहे.
शेतकरी उघड्यावर पडले असून या पत्रकार परिषदेत उमेश रामचंद्र चव्हाण यांचे शेतातील घर पाझर तलावात वाहून गेले हे सर्व कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला होता, परंतु त्यांनीही या कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचे अयोध्या पौळ म्हणाल्या. कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था झाली असून शासनाने अस्वच्छतेला पुरस्कार दिल्याची टीकाही अयोध्या पौळ यांनी केली.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा दौरा 9 ऑगस्ट पासून अयोध्या पौळ यांनी सुरू करून मतदार संघातील अनेक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्याचे सांगितले. सध्या कळमनुरी मतदार संघात गुंडशाही सुरू आहे, असा आरोपही पौळ यांनी केला आहे. कळमनुरी मतदार संघात अनेक विद्युत डीपी अभावी गावे अंधारात आहेत, रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याचे ही अवस्था म्हणाल्या. यावेळी लोहरा येथील शेतकरी उमेश रामचंद्र चव्हाण, बालाजी आडळकर हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते