हिंगोली (Kanergaon Bank ) : शेतकर्यांची शेती कामासोबत भविष्यातील पेरणीसाठी लगबग सुरु असताना कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये काही शेतकर्यांच्या बचत खात्याला होल्ड लावून नवीन पिककर्ज देण्यासाठी टाळाटाळ झाल्याने बुधवारी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांनी (Kanergaon Bank) बँकेत जावून व्यवस्थापकाला धारेवर धरून जाब विचारला.
कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये काही शेतकर्यांच्या खात्याला होल्ड करून त्यांना नवीन पिककर्ज देण्याकरीता टाळाटाळ केली जात होती. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे व नामदेव पतंगे यांच्याकडे अनेक शेतकर्यांनी व्यथा मांडली असता १६ एप्रिल रोजी त्यांनी तात्काळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये धाव घेवून (Kanergaon Bank) बँकेतील व्यवस्थापकाशी चर्चा केली. परंतु व्यवस्थापकाकडून शेतकर्यांना उध्दट वर्तुणुक मिळत असल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे यांनी आपल्या आक्रमक शैली प्रमाणे व्यवस्थापकाला धारेवर धरले.
तसेच शेतकर्यांचे बचत खाते होल्ड का केले याची विचारणा केली. ही शाब्दीक बाचाबाची बराच वेळ सुरु होती. परंतु शेतकरी व गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांनी हाच मुद्दा रेठून धरल्याने शेतकर्यांच्या खात्याचे होल्ड काढण्यास व शेतकर्यांना नवीन पिककर्ज देण्याकरीता सहमती दर्शविल्याने या वादावर पडदा पडला.
बँकेत अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
शेतकर्यांच्या बचत खात्याला होल्ड लावून शेतकर्यांना नवीन पिककर्ज देण्याकरीता टाळाटाळ झाल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे व नामदेव पतंगे यांनी (Kanergaon Bank) बँकेच्या व्यवस्थापकाला जाब विचारून धारेवर धरल्याने शेतकर्यांचा प्रश्न निकाली निघाला.
नवीन पिककर्ज देण्याकरीता टाळाटाळ
बँकामध्ये (Kanergaon Bank) शेतकर्यांना नवीन पिककर्ज देण्याकरीता टाळाटाळ होत असल्याने असा प्रकार कुठेही घडल्यास शेतकर्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केले आहे.




