कन्हान (Kanhan Youth Death) : एसंबा शेतशिवारातुन मित्रासह त्यांचे शेतातुन रानभाजी, कार्ले तोडुन एंसबा येथुन निलज मार्गे कन्हान कडे येत असताना मित्र दुचाकीचा तोल जावुन रोड लगत नालीत दुचाकीलह पडल्याने रात्रीची वेळ असल्याने कुठलिही मदत न मिळाल्याने मित्र खिलानंद उईके याचा मुत्यु झाला.
मंगळवार (दि.१६) सप्टेंबर सायंकाळी ७.४५ वाजता दरम्यान एंसबा (सालवा) ते निलज रोड ने मयुर नागपुरे आणि त्याचा मित्र शेतातुन कारले तोडुन निघाले असताना मयुर सामोर निघुन गेला व मृतक खिलानंद चमरू उईके वय ४५ वर्ष रा. दयानगर कोळसा खदान नं. ३ हा स्वत:च्या सीडी डिलक्स दुचाकी वाहनाने मागुन येत असताना काही (Kanhan Youth Death) अंतरावर दुचाकीचा तोल जावुन रोड लगत नाली मध्ये पडुन राहिल्याने त्यांचा मुत्यु झाला.
बुधवार (दि.१७) सप्टें बर ला सकाळी ७ वाजता दरम्यान एंसबा पोलीस पाटील यांनी मयुर मनोहर नागपुर वय ३२ वर्ष रा. हनुमान नगर कन्हान यास माहिती दिल्याने लगेच पोहचला असता रोड लगत नाली मध्ये त्याचा मित्र खिलानंद उईके दुचाकी सह मृत अवस्थेत पडलेला दिसल्याने त्यानी आजुबाजुच्या शेतक-यांना बोलवुन कन्हान पोलीसाना माहिती दिल्याने (Kanhan Youth Death) कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचुन पाहिले असता इसमाचा मुत्य झाल्याचे लक्षात आल्याने त्यानी घटनास्थळाचा पंच नामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात रवाना केला.
मृतक खिलानंद चमरू उईके हा आपल्या दुचाकी ने एंसबा (सालवा) येथुन मंगळवार (दि.१६) सप्टेंबर सायंकाळी ७.४५ येत असताना मयुर नागपुरे यांचे शेताच्या काही अंतरावर रोड लगत नाली मध्ये दुचाकी सह पडुन राहिला. रात्रीची वेळ असल्याने तो कुणाला ही दिसुन न आल्याने त्याला वेळीच मदत न मिळाल्या ने त्याचा मुत्यु झाल्याने (Kanhan Youth Death) कन्हान पोस्टे पोहवा रोशन देवतळे यानी मयुर नागपुरे यांचे बयाणावरून मर्ग दाखल करून थानेदार वैजयंती मंडवाधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.