बाजार समिती परिसरातील घटना, चोरटे कॅमेऱ्यात कैद
कारंजा (Karanja Crime) : मंगरूळपीर मार्गावरील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड क्रमांक 2 मधून अडत्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून साडे 4 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 11 जुलै रोजी घडली. सूत्रांच्या माहितीनुसार कारंजा बाजार समितीमधील अडते शांतीलाल रुणवाल यांनी शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाचा चुकारा करण्याकरिता (Karanja Crime) बॅंकेतून साडे 4 लाख रुपये काढून आणले. त्यानंतर ते मोपेड दुचाकीच्या डिक्कीत पैशाची पिशवी टाकून यार्ड क्रमांक २ वर आले. मोपेड उभी करून बंजरंग बलीच्या दर्शनासाठी मार्केटमधील मंदिरात गेले.
ते दर्शन घेऊन येईपर्यंत त्यांचे मागावर असलेल्या अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतून पैशाची पिशवी काढली व अगोदरच तयार असलेल्या दुचाकीवर बसून पोबारा केला. (Karanja Crime) सदर घटना मार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली परंतू चोरट्यांचे चेहरे व दुचाकीचा नंबर स्पष्टपणे दिसत नाही.
मागील वर्षी सुद्धा अडते शांतीलाल रुणवाल यांचे यार्ड क्रमांक 1 वरुन तुरीच्या मालाचा चुकारा करण्यासाठी आणलेले 8 लाख रुपये अशाच पद्धतीने त्याच मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी लंपास (Karanja Crime) केले होते. गेल्या वर्षभरात आतापर्यंत रुणवाल यांना चोरट्यांनी साडे 12 लाखांचा चुना लावला आहे.सदर घटनेची तक्रार शहर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.