कारंजा/वाशिम (Karanja farmer) : शेतात विषारी पावडरची धुरळणी करताना एका 50 वर्षीय (Karanja farmer) शेतकऱ्यास विषबाधा झाली. ही घटना सायंकाळी 5 वाजताचे सुमारास कारंजा तालुक्यातील भडशिवनी येथे घडली. बाळकृष्ण शिवदास लाहे वय 50 वर्ष असे विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते भडशिवणी येथील रहिवासी आहेत.
भडशिवणी येथील घटना
माहितीनुसार, सायंकाळी ते आपल्या शेतात असलेल्या (Karanja farmer) कपाशी पिकावर वाणीने आक्रमण केल्याने प्रतिबंधित उपाय म्हणून एका विषारी पावडरची धुरळणी करीत होते. एवढ्यात हवेमुळे पावडरचे कण त्यांचे नाका तोंडात गेल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना (Karanja Hospital) कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. त्यानुसार सध्य परिस्थितीत त्यांचेवर अमरावती येथे उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धुरळणी व फवारणी करताना काळजी घ्यावी
सध्या पेरणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, लवकरच फवारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, बूट इत्यादीचा वापर करावा, संपूर्ण शरीर झाकले जाईल, याची काळजी घ्यावी. कीडनाशके फवारणीसाठी हातापायावर जखम असलेल्या व्यक्तींची निवड करू नये, अशी काळजी घेण्याचे आवाहन (Agriculture Department) कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.