महाराष्ट्राने मिळवले कराटे मध्ये पहिले स्थान!
लातूर (Karate Competition) : युवा कार्यक्रम, खेल मंत्रालय भारत सरकार (Ministry of Sports Government of India) तसेच राष्ट्रीय खेल सवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले. महाराष्ट्राने कराटे स्पर्धेत प्रथम स्थान मिळविले. नवी दिल्लीत काल कटोरा स्टेडियमवर (Katora Stadium) या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडामंत्री विजय गोयल (Former Sports Minister Vijay Goel) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ (Minister of State for Defense Sanjay Sheth) यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. इंडियन ऑलिम्पिकच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी विडिओद्वारे संबोधन केले. याप्रसंगी स्टेअर्सचे संस्थापक श्री. सिद्धार्थ उपाध्याय, स्पर्धाप्रमुख श्री. पारस मिश्रा हे उपस्थित होते. स्पर्धा त्यागराज स्टेडियम दिल्ली (Thyagaraj Stadium Delhi) येथे संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी देशाच्या 16 राज्यातून खेळाडूंनी (Players) आपला सहभाग नोंदविला. ही राष्ट्रीय कराटे स्पर्धा (National Karate Tournament) काता व कुमिते या दोन्ही प्रकारे घेण्यात आली. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातून 70 खेळाडूंनी सहभाग घेतला.
मुंबई विभागाने सर्वात जास्त सुवर्णपदक पटकावले!
त्या खालोखाल मराठवाडा विभाग व विदर्भ विभागाने सुवर्णपदक (Gold Medal) घेऊन महाराष्ट्राची मान उंचावली. या यशाबद्दल स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टूर्नामेंट चेअरमन क्योशी राजकपूर बागडी, स्टेअर्स महाराष्ट्र कराटे प्रमुख शिहान विशाल जाधव, स्टेअर्सचे महाराष्ट्राचे टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर शिहाण गणेश मंगल गिरी यांनी स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टीम व प्रशिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले. खेळाडूंना प्रशिक्षक बालाजी गिरी, परभणी, प्रशिक्षक देविदास माने, सातारा, सुजित पत्रे, यवतमाळ, लता बारपात्रे, चंद्रपूर, मंगेश दिमटे, ठाणे, मुक्ताई जाधव, मुंबई उपनगर, झेन कंबाता, मुंबई सिटी व कल्पेश शिंदे, रायगड यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल खासदार श्री.संजय दिना पाटील व रजोल संजय पाटील यांनी स्टेअर्स महाराष्ट्र कराटे, स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टीम (Stairs Maharashtra Karate Team) व प्रशिक्षक त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.