परभणी (Thuna River Flood) : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर कातनेश्वर ते आहेरवाडी रस्त्यावरील सजगीर महाराज मंदिराजवळील थुना नदीच्या पुलावर दरवर्षी पाऊसाच्या पाण्यामुळे महापुर येत असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होते. या (Thuna River Flood) पूलाची उंची कमी असल्यामुळे थोड्याशा पाऊस आला की हा रस्ता पाण्याखाली जातो, हा रस्ता पूर्णतः बंद होतो. आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.या समस्येबाबत नागरिकांनी कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग परभणी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, या पूलाची तातडीने तांत्रिक पाहणी करून त्याची उंची वाढवावी.
विशेषतः शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी व कामावर जाणारे सामान्य नागरिक झिरो फाटा पूर्णा रोडवरील माटेगाव फुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे पर्यायी रस्त्या जमिनीलेव्हल असल्यामुळे पावसाचे पाणी थोडे ही आले की हा रस्ता बंद होतो. कातनेश्वर आहेरवाडी मार्ग पूर्णा कडे जाण्यासाठी वापर करण्यात येत आहे. या पुलावर पाणी आले की हा रस्ता बंद होतो. दरवर्षी होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी होत आहे.दरवर्षी पावसाचे पाणी सुरू झाला की काही वेळात पाऊसाचे पाणी आले की हा रस्ता पूर्णतः बंद होतो.
दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाल्याने आपत्कालीन परिस्थितीतही प्रवास शक्य होत नाही. काही वेळा पाण्यातून वाट काढताना अपघात होण्याची शक्यता देखील वाढते.या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणून फुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केवळ आहेरवाडी ते पूर्णा रोड जवळील भीम नगर जवळील कामाई वढा रस्त्यावर असलेल्या पुलाची देखील उंची वाढविण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग परभणी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, या दोन्ही ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून कामांना तातडीने सुरुवात करावी, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात, त्रास आणि वाहतूक अडथळे टाळता येतील.
सदर मागणी पूर्ण नाही झाली तर काँग्रेस पक्षाकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल अशी निवेदनाद्वारे पूर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद पारवे हनुमंत डाके विश्वनाथ मोरे निखिल धामणगावे सदाशिव वाटोडे विष्णू चापके बालाजी धुतराज अमोल डाखोरे , नसरुला पठाण भोजराज सोनटक्के विनायक यादव आदीजणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.