रस्त्याची दुरवस्था; रस्ता दुरुस्तीची मागणी
जेवनाळा (Kavadsi-Macharna Road): लाखनी तालुक्यातील मौजा कवडसी (टोली) ते मचारना या तीन किलोमीटर असणार्या रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली असून (Kavadsi-Macharna Road) रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कवडसी (टोली) ते मचारना या तीन किलोमीटर असणार्या रस्त्याचे डांबरीकरण होऊन खूप वर्षे झाली असून आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणाहून रस्ता उखडला आहे. मचारणा, मांगली, रेंगोळा, केसलवाडा(राघोर्ते) या गावांना मोठी बाजारपेठ असणार्या पालांदुर(चौ.) येथे विविध कामांकरिता जाण्याकरीता हा (Kavadsi-Macharna Road) रस्ता सोयीचा होत असल्याने अनेक नागरिक, विद्यार्थी, मजुर, शेतकरी, व्यापारी या रस्त्याने ये जा करीत असल्याने मोठी वर्दळ बघायला मिळते. विशेष करून विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या रस्त्याने दररोज प्रवास करीत असून रस्ता उखडल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघात घडले असल्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
पालांदुरला विविध कामांसाठी दिवस असो किंवा रात्र या रस्त्याने आम्ही ये- जा करीत असतो. (Kavadsi-Macharna Road) रस्ता उखडल्याणे अनेक वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा. रस्ता दुरुस्तीचे काम न केल्यास आंदोलन केल्या जाईल.
-पराग ठवकर, मचारना