तीन वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती
तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
पालोरा (Khadki Water Problem) : मोहाडी तालुक्यातील खडकी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी नेहमी ताटकळत असल्यामुळे २०२२ ते २०२३ मध्ये जलजिवन मिशन योजना अंतर्गत ८७ लक्ष मंजूर करण्यात आले असून टेंडर सुध्दा काढण्यात आले असून अर्धवट काम सुध्दा केले आहे. परंतु एक वर्षापासून कान्टैक्टर च्या निष्काळजीपणा मुळे काम बंद असल्यामुळे ग्रामस्थांना आजपावेतो (Khadki Water Problem) पाणी मिळाले नाही. त्यामुळे महीलांची पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
सविस्तर असे की जलजीवन मिशन योजना अंतर्गत (Khadki Water Problem) पाण्याची टाकीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु पाईपलाईन अर्धवट घालून काम थांबवले आहे.ग्रामिण पाणी पुरवठा विभागाला कित्येकदा तक्रार केली असून अधिकारी यांनी कंत्राटदार यांना वारंवार सुचना देऊनही पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होत नसल्याने खडकी गावातील महिलांना पाण्यासाठी तळफळत राहण्याची वेळ आली आहे.
जल जीवन मिशन योजना दोन वर्षांत पूर्ण होऊन खडकी ग्रामस्थांना पाणी (Khadki Water Problem) मिळायला पाहिजे होते. परंतु जल जिवन मिशन योजना फुसकी ठरली आहे. पावसाळा सुरू झाला असतांनाही पाणी मिळत नाही तरीही कंत्राटदार काम पूर्ण कररण्यास दिरंगाई करीत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना माहिती देण्यात आली, परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जिपणामुळे काम पूर्ण होत नसल्याने आता तरी (Jaljeevan Mission Yojana) जल जीवन मिशन योजनाचे अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भर पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी (Khadki Water Problem) दूरवर जाण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. या बाबतीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लक्ष देवून खडकी येथील जलजीवन मिशन योजनेचे (Jaljeevan Mission Yojana) पूर्ण करण्यात यावा व ग्रामस्थांना सुध्दा त्रास होणार नाही. तरी तात्काळ जलजीवन मिशन योजना अंतर्गत काम सुरू करावा अशी मागणी सरपंच अश्विन बागडे यांनी केली आहे. समजा या महिन्यात काम पूर्ण न केल्यास अन्यथा आम्ही समस्त ग्रामवासी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करु असा इशारा सरपंच अश्विन बागडे यांनी दिला आहे.