चार तरुण थोडक्यात बचावले
Yawatmal :- घुग्घुस परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी संध्याकाळी ५ वाजता डब्ल्युसीएल वणी परिसरातील निलजाई खाण परिसरात मोठा अपघात (Accident)झाला. उकाणीकडे जाणार्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला ढिगारा अचानक कोसळला. मातीचा ढिगारा रस्त्यावर इतक्या वेगाने पसरला की तेथून जाणारी एक स्कॉर्पिओ आणि ट्रक त्यात पूर्णपणे अडकला. स्कॉर्पिओमध्ये (Scorpio) बसलेले चार तरुण मागच्या दारातून कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले




