हिंगोली (Konatha Burglary) : वसमत तालुक्यातील कोनाथा येथे घरफोडीची घटना घडवून ५ लाख ५५ हजारांचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याने हट्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वसमत तालुक्यातील कोनाथा येथे १८ जून रोजी रात्री १० ते मध्यरात्री २ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ओमकार अशोकराव बेंडे यांच्या राहत्या घरात प्रवेश करून त्यांच्या (Konatha Burglary) घराच्या समोरील लोखंडी गेटचे व खोलीचे कुलूप तोडून कपाटातील ५ तोळ्याचा दिड लाख रुपयाचा सोन्याचा नेकलेस, दिड लाखाचा पाच तोळ्याचा सोन्याचा पोहे हार, दिड लाखाचे ५ तोळ्याचे सोन्याचे गंठन, ६० हजार रुपयाचे दोन तोळ्याचे दोन सोन्याचे कानातले वेल, ४५ हजार रुपयाच्या दिड तोळ्याच्या तीन अंगठ्या असा एकुण ५ लाख ५५ हजार रुपयाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला.
या (Konatha Burglary) प्रकरणी १९ जूनला हट्टा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव हे करीत आहेत.




 
			

