कोरची (Korachi Farmer) : कोरची तालुक्यातील सोहले गावातील एका (Korachi Farmer) शेतकऱ्यावर शेतात काम करत असताना (wild animal attack) वन्यप्राणी सांभरीने आकस्मिक हल्ला केल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. रंजन महारू काटेंगे वय ६० वर्ष राहणार सोहले, ता कोरची असे गंभीर जखमी शेतकरीच नाव आहे. सध्या शेतीच्या कामाची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू असून शेतातील काम करण्यासाठी रंजन हा सकाळी घरातून निघाला आणि शेतात काम करत होता दरम्यान २ जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जंगलातील वन्यप्राणी सांभरीने शेतकऱ्यावर अचानक हल्ला चढवला यावेळी शेतात (Korachi Farmer) रंजन काटेंगे हा एकटाच काम करत होता पत्नी दुपारी शेतावर येणार होती परंतु शेजारी असलेले शेतकरी रंजनच ओरडण्याचा आवाज ऐकताच धावून आल्यामुळे सांबर पळाले.
जिल्हा रुग्णालयात बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गंभीर जखमीशी भेट
दरम्यान रंजनला खूप दुखापत झालं होत त्यामुळे तात्काळ कोरची (Korachi Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक उपचार देऊन रंजन च्या छातीला आणि डावा डोळा वर गंभीर दुखापत असल्यामुळे पुढील उपचारासाठी (District hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केला. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून रंजन धोक्या बाहेर आहे. सदर घटनेबाबत दोन दिवसानंतर बेडगाव वन विभागात अर्ज दाखल करण्यात आलं त्यानंतर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या चमुसह गडचिरोली जिल्हा रुग्णालय गाठुन गंभीर जखमीची पाहणी करून विचारपूस केली.
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात (wild animal attack) किरकोळ जखमी असेल तर ५० हजारापर्यंत मदत आहे तर गंभीर जखमी असेल तर पाच लाखापर्यंत आणि जखमी होऊन अपंगत्व आल्यास साडेसात लाखापर्यंत वन विभागाकडून मदत केली जाते. घटनास्थळ गाठून पंचनामा करून शाक्षदारांचे बयान घेऊ आणि वन विभागाकडून योग्य ती मदत नक्कीच मिळवुन देणार अस आश्वासनही वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी दिलं. यावेळी बेतकाठी वनपाल आर. पी. ठाकरे, भीमपूर वनरक्षक माही कुंजाम उपस्थित होते.