Korchi :- ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊनही नागरीकांना आवश्यक त्या प्रमाणात मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध होत नसल्याने संतापलेल्या कोरची वासीयांनी प्रस्थापितांचा विरोध असतांनाही आज २२ सप्टेंबर रोजी कोरची तहसील कार्यालयावर धडक देऊन अन्याय, भ्रष्टाचार (Corruption) व उदासिनतेविरोधात आवाज बुलंद केला. कोरची शहरातील महात्मा फुले चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला.
प्रस्थापितांचा विरोध असतानाही अन्याय, भ्रष्टाचार आणि उदासिनतेविरुद्ध आवाज केला बुलंद
मोर्चाचे नेतृत्व डॉ. शैलेंद्र बिसेन, शालीकराम कराडे, सियाराम हलामी, नंदकिशोर वैरागडे, निरिंगसाय मडावी, गुरूदेव मेश्राम, राकेश मोहुर्ले यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरीकांनी केले. विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळ नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागरीकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा देण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री (chief minister), ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली, तहसीलदार आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चात कोणीही सहभागी होऊ नका असे प्रस्थापित राजकीय पक्षातर्फे बजावण्यात आले होते. मात्र हा विरोध झुगारून शहरातील बहुसंख्य नागरीक सहभागी झाले होते.
यावेळी अरविंद अंबादे,देवाजी मोहुर्ले, उत्तरा अंबादे,तब्बेज जाडीया, कमलेश भानारकर, रमेश पोरेटी, क्षिरसागर नेवारे,अनिल उईके, विठ्ठल गुरूनुले,गोपाल मोहुर्ले, मधुकर शेंडे,रोशन शेंडे, मुरली शेंडे, धनराज मोहुर्ले, दिपक मोहुर्ले, विशाल जांभुळे, हसिर शेख, दल्लुराम फुलकवर, कुमारसाय मडावी, चंद्रशेखर वालदे, दिंगाबर पडोटी , कृष्णा पडोटी, राजु गुरूनुले, प्रविण गुरूनुले, पदमा फुलकवर,अनुसया बागडेहरिया, भारती फुलकवर,शकिता फुलकवर,ममता जमकातन,सुरेखा जमकातन, सरजुराम जमकातन,सिता जमकातन, अर्चना फुलकवर, अगरबत्ती जमकातन,कुमारीबाई फुलकवर, संतोषी खोब्रा, श्रीहरी मोहुर्ले, साईनाथ मोहुलेॅ,तोषण टेंभुर्णे,सिताबाई हिडामी, आशा शर्मा,शामकला सहारे,जया सहारे ,सुरती जमकातन, प्रभाकर कराडे, दामोदर कुंभारे, रोहीत सोनकुकरा, महेश पोरेटी, देवलाल सांगसुरवार, वामन मोहुर्ले, तोषण टेंभुर्णे ,सिता हिडामी, आशा शर्मा, श्रीराम निंबेकर,जोहन हिरवाणी, गोपाल मोहूर्ले, अनिल वाढई यासह बहुसंख्य नागरीक सहभागी झाले होते.