राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन शून्य कारभार!
कोरची (Korchi Kurkheda Accident) : मागील काही दिवसांपासून कोरची-कुरखेडा मार्गावर अपघाताच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सदर मार्ग हे अपघाती मार्ग बनले असल्याचे दिसून येत आहे. कोरची कुरखेडा हे राष्ट्रीय महामार्ग (National Highway) असल्यामुळे या मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते. परंतु मागील काही दिवसांपासून सुरजागड येथील खाणीचे ट्रक (Mining Trucks) ह्या मार्गाने सुसाट पणे गाडी चालवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अपघातांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुसाट ट्रकने या दुचाकीला जबर धडक दिली
आज सकाळी सुमारे 10 च्या दरम्यान कोरची मुख्यालयापासून अंदाजे 8 किलोमीटर अंतरावर पोलीस मदत केंद्र बेडगाव (Police Help Center Bedgaon) अंतर्गत येणाऱ्या कोरची कुरखेडा मार्गावर आपल्या झगडवाही येथील नातेवाईकाची प्रकृती बघण्याकरिता कुरखेडा तालुक्यातील जामटोला येथून राजाराम उसेंडी वय 66 व रेवताबाई उसेंडी वय 60 हे MH 33 L 6425 क्रमांकाच्या दुचाकी ने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुसाट ट्रकने या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, रेवताबाई यांच्या शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला व राजाराम यांचा पाय पूर्णपणे तुटला, तसेच त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली.
घटनास्थळावरून सदर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार!
घटनास्थळावरून सदर ट्रक चालक (Truck Driver) ट्रक घेऊन पसार झाला परंतु घटनास्थळावर ट्रकच्या चाकाचे चिन्हाने स्पष्टपणे दिसून येत आहे की ट्रक हा चुकीच्या दिशेने ट्रक चालवीत होता व त्या ट्रकची गती सुद्धा प्रचंड असावी. सदर मार्गावर बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून बहुतेक ठिकाणी साईड बंब सुद्धा टाकण्यात आले नसल्यामुळे रस्ता संकीर्ण असून सुद्धा रस्त्याचा खाली बहुतेक चालक आपले वाहन उतरवित नाही, त्यामुळे सुद्धा अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.
खाजगी वाहनाने करण्यात आले जखमीला भरती!
108 रुग्णवाहिकेला संपर्क केला असता, रुग्णवाहिका जवळ कुठेही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले नंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या राजाराम उसेंडीला तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची (Rural Hospital Korchi) येथे खाजगी वाहनाने भरती केले. प्राथमिक उपचार करून सदर रुग्णाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असून पुढील तपास बेडगाव पोलीस (Bedgaon Police) मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे करीत आहेत.