पन्नास दिवसाआधी बदली आदेश मिळाल्यानंतर सोडले नाही पदभार
गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या बदली आदेशाला दाखविली केराची टोपली
लाखांदूर (Lakhandur Panchayat Samiti) : महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी अशी ग्रामपंचायतचे दर्जानुसार ग्राम पंचायत सचिव पदाचे नामांतरण मागील पाच ते सहा महीन्याआधी फक्त एकच ग्रामअधिकारी असे केले आहे. (Lakhandur Panchayat Samiti) लाखांदूर तालुक्यातील ग्राम अधिकारी यांच्या तालुकास्तरीय प्रशासकीय/विनंती बदल्या सन २०२५ कार्यशाळा पं.स. लाखांदुर सभा शासन निर्णयानुसार दि. २९ मे २०२५ ला तालुकास्तरीय ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रशासकीय/विनंती बदल्या संबधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेला सभापती पी.बी. ठाकरे व गटविकास अधिकारी एन.एस. धारगावे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती (Lakhandur Panchayat Samiti) लाखांदूर येथील सभागृहात कार्यशाळा समुपदेशाने पार पडली. (Lakhandur Panchayat Samiti) ग्रामपंचायत अधिकार्यांची एकूण कार्यरत पदे ४२ इतकी आहेत. प्रशासकिय बदल्या १० टक्के व विनंती बदल्या ५ टक्के करणे आवश्यक असल्यामुळे प्रशासकिय बदलीस ४ कर्मचारी पात्र ठरतात. २ कर्मचारी विनंती बदलीस पात्र ठरतात. विनंती अर्ज २ प्राप्त झाल्यामुळे विनंती बदली करण्यात आलेली आहे.
सदर तालुकास्तरीय बदली कार्यशाळेत ४ प्रशासकीय बदल्या व २ विनंती बदल्या समुपदेशाने करून, बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार सदर ग्रामअधिकारी यांना आदेशही दि.३० मे २०२५ ला करण्यात आले. मात्र अजूनही यापैकी व यांचे आधी ग्रामअधिकारी यांना बदलीचे आदेश देवून ५० दिवसाचे वर झाले असतांनाही बहुतांश (Lakhandur Panchayat Samiti) ग्रामअधिकारी यांनी आपले कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतचे पदभार सोडले नाही.
त्यामुळे तालुक्यात सदर प्रकरणाचे बाबतीत चर्चांना उधाण आले असून हे अधिकारी पदभार का सोडीत नाहीत? असा प्रश्न निर्माण करीत असून कार्यरत ग्रामपंचायत मध्ये (Lakhandur Panchayat Samiti) काही अफरातफर केली का? त्याची सारवासारव बाकी आहे की ग्रामसेवक स्वत: विकास कामे करीत आहेत किंवा त्या गावात झालेल्या विकास कामाचे बिल निघणे बाकी असुन त्यातील मिळणारा आर्थिक लाभाचे प्राप्ती करीता सोडीत नाही. त्या खुर्चीचे मोहात आर्थिक लाभापोटीच सोडत नसल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सदर पं.स. वरीष्ठांशी साठगाठ तर नाही ना की अजुन पर्यंत वरीष्ठांकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनात येत आहे. करीता याकडे तात्काळ पं.स. तथा जि.प. चे वरीष्ठ अधिकारी यांनी गांभिर्याने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेकडुन होत आहे.
आमचे कडून ग्रामअधिकारी (Lakhandur Panchayat Samiti) यांचे प्रशासकीय ४ व विनंती २ अशा एकूण ६ जणांना दि. ३० मे २०२५ ला नविन ग्रामपंचायतला रुजु होण्यासबंधी आदेशीत केले असुन त्यांनी सदर आदेश प्राप्तीनंतर एक महीण्याचे आत आपले जुन्या ग्रामपंचायत मधील कार्यभार दुसर्या अधिकारी यांचेकडे सोपवुन नवीन ठिकाणी पदभार घेणे आवश्यक असता त्यांनी नवीन पदभार स्वीकारले नसल्याचे तक्रारी प्राप्त नाही व अजुनही ज्यांनी पदभार स्विकारले नाही, अशांना नोटीश देवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– नेताजी धारगावे, गटविकास अधिकारी, पं.स.लाखांदूर