आमदार पटोलेंनी स्वखर्चाने रुग्णवाहिकेतून पाठविले मृतदेह
लाखांदूर (Youth Murder Case) : लाखांदूरच्या तरुणाचा पुण्यात खून झाला असता हलाखीचे परिस्थितीमुळे मृतदेह गावी आणण्याची अडचण होत असल्याचे साकोली क्षेत्राचे आ. नाना पटोले यांना मिळताच त्यांनी स्वखर्चातून रुग्णवाहिकेने मृतदेह गावी पाठविले असल्याने त्यांचे मानवतेचे कार्याची क्षेत्राला पुन्हा ओळख पटली. प्राप्त माहितीनुसार, आळंदी पुणे येथे घडलेल्या खळबळजनक खून (Youth Murder Case) प्रकरणात लाखांदूर येथील प्रकाश विठोबा भुते (३९) याची हत्या करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासुन तो उदरनिर्वाह करीता तो पुणे येथे कामावर होता. दि.२४ जुलै रोजी तो सकाळी ९.३० वाजता आळंदी-मरकळ रस्त्यालगत धारोरा येथे न्यु हिना हेअर कटींग सलुन जवळ एका अज्ञात इसमाने त्याचे डोक्यावर सिंमेंटब्लॉकने हल्ला करुन हत्या केली. या (Youth Murder Case) प्रकरणात त्याची पत्नी लता भुते हीने आळंदी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास करुन संशयीत पुंडलिक ज्ञानदेव काळे व त्यांचे अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी गुन्हाची कबुली दिली.
त्यानंतर मृतकाची परिस्थिती हालाखीची असता मृतदेह लाखांदुरला कसे न्यायचे या विवंचनेत कुटुंबिय पडले. दरम्यान लाखांदूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनेची माहीती आमदार नाना पटोले यांना दिली असता त्यांनी आपल्या स्वखर्चातून रुग्णवाहिकेने (Youth Murder Case) मृतदेह लाखांदूर नेण्याची व्यवस्था केली. रुग्णवाहिका मृतदेह घेवून लाखांदूरला २५ जुलैला दुपारी १२ वाजता पोहचताच कुटुंबियांनी दु:खाचा हंबरडा फोडला. यावरुन गरीब कुटुंबियांना मदत केल्याने आ.नाना पटोले यांचे सेवाभावी मानवतेचे दर्शन जनतेला घडले.