आमदार संतोष बांगर यांनी केली सपत्नीक महापूजा
औंढा नागनाथ (Shri Nagnath Temple) : येथील भारतातील आठवे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ येथील श्री नागनाथाचे श्रावणातील पहिल्या श्रावण सोमवारी बम बम भोले हर हर महादेवाच्या गजरात हजारो भाविकांनी नागनाथाचे दर्शन (Shri Nagnath Temple) घेतले तत्पूर्वी उत्तर रात्री एक वाजता कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या हस्ते नागनाथा ची विधीवंत सपत्नीक महापूजा करून पहाटे दीड वाजता मंदिराचे दरवाजे शिवभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनीही नागनाथाचे दर्शन घेतले.
यादरम्यान सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. त्यामुळे (Shri Nagnath Temple) मंदिर परिसरही प्रचंड गर्दीने फुलून गेला होता हर हर महादेवाच्या गजरात मंदिर परिसर दणाणला होता यावेळी नागनाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे ,अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गार्ड प्रमुख बबन सोनूणे जगदेव दिंडे यांचे सह नागनाथ संस्थांनचे कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवले, तर पोलीस बंदोबस्त अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपाधीक्षक सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त प्रभारी पोलीस निरीक्षक जी.एस राहीरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अफसर पठाण, यशवंत गुरुपवार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शेख खूद्दूस, जमादार संदीप टाक गजानन गिरी अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर बंदोबस्त ठेवला होता दरम्यान दिवसभरात लाखावर भाविकांनी (Shri Nagnath Temple) श्री नागनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिराची व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी दिली.