परभणीत आंदोलन जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
परभणी (Parbhani Andolan) : पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा व इतर सर्व धार्मिक महापुरुषांच्या अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करावेत, या मागणी करीता शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी मजलिस तहफुज ए खतम ए नबुवत च्या वतीने (Parbhani Andolan) परभणीत आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाला मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.
कोणत्याही धर्माच्या महापुरुषांचा अवमान करु नये या साठी कठोर कायदा करावा, गैरजामीन गुन्हा घोषीत करावा, भारतीय न्याय संहितेतील धार्मिक भावना भंग होण्याशी संबंधित कलमांचा पुनर्रावलोकन व सुधारणा करावी या प्रकारचे गुन्हे जलद गती न्यायालयात चालवावेत, डिजीटल व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अवमानकारक उत्तेजक सामुग्री त्वरीत हटविण्यासाठी कडक नियमन, प्लॅटफॉर्मसाठी जबाबदारी ठरवावी, सर्व धर्मांना समान रित्या संरक्षण देणारा कायदा करावा, समाज कंटकांवर शिक्षा निश्चित करावी.
शहाजहाँपूर, कानपूर इत्यादी प्रकरणात कोणतेही निर्दोषी बंद असतील तर त्यांची तात्काळ चौकशी करत रिहाई करावी. (Parbhani Andolan) दोषींवर कारवाई करावी. केंद्र सरकारने एक समन्वयीत समिती, पॅनल स्थापन करावे जे राज्यांशी समन्वय करुन योग्य कायदेशीर सुधारणा, अंमलबजावणी आणि सामाजिक शांतता वाढविण्यासाठी धोरण आखतील. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर मुफ्ती अब्बास कासमी, मुफ्ती अब्दुल अजीम कासमी, मुफ्ती सईद अन्वर कासमी, मुफ्ती साजेद नदवी, हाफेज मोहतसीम फलाही, मुफ्ती शफिक कासमी, मौ. तलहा बेग, मुफ्ती सलीम कासमी, हाफेज रईस फईजी आदींची नावे आहेत.