हिंगोली (Hingoli court) : येथील न्यायालय मध्ये विधीज्ञाना अनेक समस्यांना तोंड द्यावी लागत असल्याने 22 ते 25 एप्रिल दरम्यान प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून (Hingoli court) न्यायालयीन कामकाज करण्याचा निर्णय जिल्हा वकील संघाने घेतला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरामध्ये (Hingoli court) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण 22 फेब्रुवारीला. इमारत टोलेजंग बांधण्यात आली आहे. परंतु या इमारतीमध्ये विधीज्ञाना बसण्याकरता कोणतीही फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही या संदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा फर्निचर उपलब्ध करून दिले नाही. तसेच न्यायालयाच्या इमारतीत कॅन्टींग सुद्धा सुरू करण्यात आले नाही.
अशा अनेक समस्या बाबत निवेदन देऊन सुद्धा त्यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही त्यामुळे 21 एप्रिल सोमवार रोजी (Hingoli court) जिल्हा वकील संघाने न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदवू नये असे ठरवण्यात आले परंतु सदर आंदोलन सर्व कायदे बाबीची पडताळणी करून कायदीय सल्लागार समिती गठित करण्यात आली त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 22 एप्रिल पासून 25 एप्रिल पर्यंत प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फित लावून न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आंदोलनाची पुढील रूपरेषा 28 एप्रिल ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला.