हिंगोली (Hingoli Court) : येथील जिल्हा न्यायालयाच्या टोलेजंग इमारतीमध्ये विधिज्ञ व पक्षकारांसाठी भौतिक सुविधांचा अभाव असल्याने जिल्हा वकील संघाने २२ एप्रिलपासून काळ्या फिती लावून कामकाज केले. हे आंदोलन २५ एप्रिल पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. सुनीलकुमार भुक्तार यांनी दिली आहे.
कोट्यावधी रुपये खर्चातून (Hingoli Court) जिल्हा न्यायालयाची इमारत उभारण्यात आलेली आहे. फेब्रुवारीमध्ये या न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन इमारतीत्त भौतिक सुविधांचा अभाव असल्याने या संदर्भात जिल्हा वकील संघाने वेळोवेळी लेखी व तोडी स्वरूपात प्रशासनाकडे मागणी केली असता केवळ आश्वासन मिळाले.
प्रशासनाने समस्यांच्या निराकरणासाठी उदासिनता दाखविल्याने (Hingoli Court) जिल्हा वकील संघाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासाठी रुपरेषा ठरविण्याकरीता अँड. आर. एन. अग्रवाल, अँड. पी. के. पुरी. अँड. एम. एस. एस. साकळे, अँड. एस. एम. गांजरे, अँड. ए. यू. चव्हाण, अँड. एस. एम. पठाडे या सदसीय समितीने आआंदोलन संदर्भात कायदे विशयक सल्ला दिला. समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रशासनाध्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले. त्याचा भाग म्हणून २२ ते २५ एप्रिल पर्यंत काळ्या फिती लावून काम केले जाणार. या आंदोलनाला मंगळवार पासून सुरुवात केली असून वकील संघाच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी अध्यक्ष अँड.सुनील कुमार भुक्तार यांनी केली आहे.
वकील संघाच्या या आहेत मागण्या
हिंगोली वकील संघ (Hingoli Court) येथे ४१७ विधिज्ञ असताना पफक्त १ हॉल व अपुरे फर्निचर देण्यात आले. इमारतीत विधिज्ञ व पक्षकारासाठी उपहार गृहाची व्यवस्था नाही. विधिज्ञांसाठी लॉकर सुविधा, पंथालय, नोटरी वकीलांना बसण्यासाठी जागा (इमारतीत) बार टायपिस्ट व शेरॉक्सची सुविधा, ऑनलाईन फायलिंग साठी इंटरनेट सूि सुविधा, महिला विधिज्ञांकरीता स्वच्छता गृह या मागण्यांकडे लक्ष घालून पुर्तता करण्याची मागणी होत आहे.




