बोगस जन्म दाखला प्रकरणाचा घेतला आढावा
हिंगोली (BJP Kirit Somaiya) : जिल्ह्यात चुकीच्या पध्दतीने देण्यात आलेल्या जन्म दाखल्या प्रकरणी प्रस्तावित कारवाईचा आढावा घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी मंगळवारी हिंगोलीत बैठक घेतली. या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून या प्रकरणी लवकरच कारवाईचा फास आवळणे सुरू होईल असे संकेत आहेत.
हिंगोली तहसील कार्यालयातंर्गत नायब तहसीलदारांनी १०४६ जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याचा विषय यापूर्वीच उघडकीस आला होता. राज्यभरात अशा प्रकारे प्रमाणपत्रे मिळवून नागरिकत्व मिळविल्याचे प्रकार अकोला येथील एका प्रकरणात उघडकीस आले होते. याच श्रृंखलेत हिंगोलीतही मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे वितरित झाल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश काढले होते. ५ मे रोजी काढण्यात आलेल्या या आदेशात ३१ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान देण्यात आलेल्या १०४६ जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई कोणत्या स्तरावर आहे, याची माहिती घेण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, माजी नगरसेवक उमेश गुठ्ठे, उमेश नागरे, राजू यादव, रजनिश पुरोहीत, अॅड. के. के. शिंदे, सुभाषचंद्र लदनिया यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांची उपस्थित होती.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी चुकीचे जन्म दाखले केवळ रद्दच केले जाणार नाहीत तर धारकांकडून ते परत घेण्याची जबाबदारी प्रशासनावर राहील तसेच आवश्यक कागदपत्रे सादर न करता प्रमाणपत्र मिळविलेल्या धारकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच अधिकार नसतांना प्रमाणपत्र देणान्या नायब तहसीलदारांवरही विभागीय चौकशीची कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है २९, में रोजी हिंगोलीत येणार आहेत. त्यापूर्वीच भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांची हिंगोलीत बनावट जन्म दाखल्या निमित्त एन्ट्री झाल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे.
देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने विषय गंभीर
हिंगोली सहीत राज्यभरात हजारो जन्म दाखले चुकीच्या पध्दतीने देण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे, अचानक कुठून तरी आलेल्या लोकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न करता जन्म दाखला देण्याचे अधिकारी नसलेल्या नायब नायब तहसीलदाराकडून जुन्या तारखेत जन्माचे दाखले घेतले आहेत. वास्तवित जन्मापासून त एका वर्षाच्या आतच असे दाखले दिले जाऊ शकतात. या दाखल्याच्या आधारावर आधार कार्ड, पॅनकार्ड, राशनकार्डा पासून पासपोर्ट पर्यंतची कागदपत्रे तयार करणे सोधीचे ठरते. यामुळे परदेशी नागरीकांना विनासायास भारताचे नागरिकत्व मिळत ६ असते. हा विषय देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने गंभीर आहे.




 
			

