Gadchiroli :- सर्व निराधारांना मासिक अडीच हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डाव्या पक्षांच्यावतीने आज शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयापुढे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देण्याची मागणी
संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे यासाठी शेतकरी(Farmer) कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील दिव्यांग (disabled) लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात विधवा, परित्यक्ता व वयोवृध्द निराधार संकटात सापडले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमुद केले आहे. गडचिरोली येथील आंदोलना शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे ,रामदास दाणे, किसन साखरे, महागू पिपरे, गजानन झाडे, एकनाथ मेश्राम, तरकडू भोयर, मारोती मडावी, माणिकराव शिडाम, देवाजी गेडाम, भाऊ गुरुनूले, महादेव नैताम, सोमाजी राऊत यांच्या सह शेकडो निराधार लाभार्थी उपस्थित होते.
आरमोरी येथील तहसिल कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, विठ्ठल प्रधान, राजू सातपुते, अशोक शामकुळे, रमेश मेश्राम, प्रमोद कोजेकर, अर्चना मारकवार, रंजना कुंभलकर यांनी केले. एटापल्ली, चामोर्शी येथेही आंदोलन करण्यात आले.