श्रमिक पत्रकार संघाचा जीवनगाैरव पुरस्कार साेहळा
अमरावती (Lifetime Achievement Award) : आपल्या पत्रकारितेच्या कारर्किदीत आपण प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाेबत पत्रकारितेची तत्व आयुष्यभर जपली आहेत. अमरावती (Shramik Journalists Union) श्रमिक पत्रकार संघाने आपणास जीवनगाैरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) देऊन आपल्या कर्तव्याचा सत्कार केल्याचे भावनिक मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश शुक्ल यांनी व्यक्त केले.
अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे (Shramik Journalists Union) रविवारी (ता.28) स्थानिक हाॅटेल प्राईम पार्क येथे जीवनगाैरव पुरस्कार साेहळ्याचे सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. अमरावती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जाेशी, माहीती संचालक हेमराज बागुल, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखाेडे, दै. प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा उपस्थित हाेते. सत्कारमूर्ती सुरेश शुक्ल यांना अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारिता जीवनगाैरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व 21 हजार रूपयाचा धनादेश देऊन त्यांना मान्यवरांचे हस्ते गाैरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देतांना सुरेश शुक्ल यांनी त्यांची कारर्कीद, पत्रकारितेतील जडण-घडण व सामाजिक पत्रकारिता यावर मत व्यक्त केले. विविध वर्तमानपत्रांमध्ये कार्य करीत असतांना आपणास अनेकांचे सहकार्य लाभले. इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आग्रही भूमिकेचे हाेताे. आज आपण पत्रकारितेत सक्रिय नसलाे तरी पत्रकार म्हणून समाज व पत्रकारितेतील घडामाेडी जाणून घेत असताे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी यदुनाथ जाेशी म्हणाले की, पत्रकारांकडून समाजाला अपेक्षा असतात. परंतु, पत्रकारांच्या साेयी-सुविधांकडे समाज व्यवस्थेचे दुर्लक्ष असते. वर्तमानपत्रांनी अनेकांना माेठे केले आहेत. परंतु ही माणसे आज वर्तमानपत्रांना विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अलीकडे इलेक्ट्राॅनिक मिडियाचा प्रभाव असला तरी आकाशवाणी प्रमाणेच वर्तमानपत्रांना पुन्हा सुगीचे दिवस येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रादेशिक वाद व असमानता असताना आता उपप्रादेशिक वाद पुढे येत आहे. विकास म्हणजे नागपूर दिसतो. यात अमरावती विभाग दिसून येत नाही. यादृष्टीने आता पावले उचलली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
राज्य अधिस्वीकृती अध्यक्ष म्हणून आपण पत्रकारांच्या हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत असताे. केवळ अधिस्वीकृतीच नव्हे तर पत्रकारांना पेंशन व आराेग्य सुविधाबाबत शासनाचे धाेरण ठरावे,यासाठी श्रमिक पत्रकार संघटनेसह सर्वच संघटनांनी एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ संपादक नानक आहुजा यांनी वर्तमानपत्रांपुढे आवाहनांची माहीती दिली. काेराेना काळानंतर विभागीय पातळीवर वर्तमानपत्रांना जाहीराती मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानीक वर्तमानपत्रे आज आर्थिक सामना करीत असल्याने शासनाने याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले. यावेळी माहीती संचालक हेमराज बागुल म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी आपण असलाे तरी पूर्वी आपण पत्रकारिता केली. त्यामुळे पत्रकारांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे पत्रकारांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असताे असे त्यांनी सांगितले.
अमरावती श्रमिक पत्रकार संघाचे (Shramik Journalists Union) अध्यक्ष गाेपाल हरणे यांनी अध्यक्षीय भाषणात सुरेश शुक्ल यांची कारकीर्द व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितले. श्रमिक पत्रकार संघाचे प्रलंबित मुद्दे सरकारकडून सोडविण्याची मागणी यदुनाथ जोशी यांच्याकडे केली. श्रमिक पत्रकार संघाचे सचिव रवींद्र लाखाेडे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकारितेसाठी आयुष्य वेचलेल्यांचा सन्मान करण्याचा संघाचा प्रयत्न केला. यातून नव्या पत्रकारांना प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश शेरेकर यांनी केले. अमरावती विद्यापीठाचेे सिनेट सदस्य म्हणून राज्यपालांनी नियुक्ती केल्याबद्दल गिरीश शेरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार कुमार बोबडे यांनी कार्यक्रमादरम्यान सत्कारमूर्ती सुरेश शुक्ल यांच्या कारकिर्दीचा उपस्थितांना परिचय करून दिला. सुरेश शुक्ल यांनी पत्रकारितेचा आदर्श पुढे मांडल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य व ज्येष्ठ संपादक अॅड. दिलीप एडतकर, वरिष्ठ पत्रकार अनिल जाधव, संपादक जयराम आहूजा, प्रवीण आहूजा यांचेसह भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्रा. दिनेश सूर्यवंशी, श्रमिकचे पदाधिकारी अमाेल इंगाेले, कृष्णा लाेखंडे, प्रदीप भाकरे, प्रवीण कपीले, शैलेश धुंदी, भैय्या आवारे, सुरेंद्र आकाेडे, त्रिदीप वानखडे, वैभव बाबरेकर, धनंजय साबळे, मिनाक्षी काेल्हे, श्रीरंग ढाेके, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सूने, युसुफखान, बाळासाहेब सोरगिवकर आदी उपस्थित हाेते.
