एमपीडीए कायद्यांतर्गत कार्यवाही
तुमसर (Bhandara Jail Case) : समाज विघातक कृत्य करून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशा समाज विघातक कृत्य करणार्या अवैध दारू विक्रेता लक्ष्मण कुंभले (३९) रा. मेहगाव याचेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कार्यवाही करून त्याला भंडारा कारागृहात (Bhandara Jail Case) स्थानबध्द करण्यात आले.
तुमसर तालुक्यातील मेहगाव येथील लक्ष्मण कुंभले याचे विरूध्द पोलिसात अवैधरित्या दारू विक्री करणे, दुखापत करणे, साहित्यांचे नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे यामुळे समाजातील सभ्य लोकांना, व्यापारी, तरुणी, महिला व इतर प्रतिष्ठीत व्यक्तींवर विपरित परिणाम होऊन सामाजिक जीवन जगणे कठीण होत आहे.
अशा परिस्थितीत कायद्याच्या चाकोरीत राहून अशा समाजविघातक कृत्य करणार्या व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांनी (Bhandara Jail Case) अवैधरित्या दारू विक्री करणारा लक्ष्मण कुंभले याचेविरूध्द तुमसर पोलिसात गुन्हेगारी अभिलेख लक्षात घेता त्याचेविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली होती. सदर कार्यवाही दि.२ सप्टेंबर रोजी एका आदेशान्वये करण्यात आली होती.
मात्र, फरार असलेल्या लक्ष्मण कुंभले याचेवर दि.८ सप्टेंबर रोजी कार्यवाही करून भंडारा जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोर, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोनि नितीन चिंचोळकर, पोउपनि प्रवीण सयाम, पोहवा राजेश पंचबुध्दे, शिवाजी कनोजिया, नितीन झंझाड, राजकुमार गिर्हेपुंजे, अजय बावने, परिमल मुलकलवार आदींनी केली आहे.