शेतात काम करणार्या इसमावरही हल्ला
लोहारा/गायमुख (Loose Dogs) : मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथे सध्या मोकाट कुत्र्यांच्या चांगलाच हैदोस वाढला आहे. त्यामुळे जनावरासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण गावात कमीत कमी (Loose Dogs) दहा कुत्र्यांचा वावर आहे. हे कुत्रे दिवसा फार कमी आढळतात. पण रात्री मात्र या कुत्र्यांचा समूह एक होऊन संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून फिरत असतात. रात्रीच्या सुमारास हे कुत्रे रस्त्यावर गोळा होऊन येणार्या जाणार्या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
ग्रामीण क्षेत्र असल्याने शेतीमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस होऊ नये म्हणून शेतीच्या संरक्षणासाठी शेतकरी पाळीव कुत्रे पाळतात. तसेच अनेक नागरिक घरगुती कुत्रे सुद्धा पाळत असतात. परंतु हल्ला करीत असलेले कुत्रे नेमके कुणाचे हे मात्र अद्यापही कळू शकले नाही. त्यामुळे आता या (Loose Dogs) कुत्र्यांपासून नागरिक चांगलेच संतापले आहेत. शेतकर्यांचे गाव असल्याने घरोघरी शेळ्या, गाय, म्हशी, पाळीव प्राणी आहेत. पण अशा मोकाट कुत्र्यांमुळे ते असुरक्षित आहेत. आत्ताच आठवड्यापूर्वी गांधी चौकामधील बाजारचौक परिसरातील सत्यवान हलवारे यांच्या शेळ्या गोठ्यात बांधलेल्या होत्या.
मोकाट कुत्र्यांनी (Loose Dogs) मध्यरात्री गोठ्यात असलेल्या चारही शेळ्यावर हल्ला केला. त्यात चारही शेळ्या रक्तबंबाळ झाल्या आणि चारही शेळ्यांच्या जागीच मृत्यू झाला. जवळपास ६० ते ७० हजार रुपयांच्या या शेळ्या होत्या. देवा सेलोकर यांच्या घरी गोठ्यातुन ताडपत्रीला फाडून शेळीचा एक पिल्लू मोकाट कुत्र्यांनी पळवून नेला. राजकुमार मते आपल्या शेतात काम करत असताना मोकाट कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना दोन ते तीन ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे.
अशा अनेक घटना (Loose Dogs) मोकाट कुत्र्यांपासून गावात घडत आहेत. त्यामुळे यात झालेल्या नुकसानीचे जबाबदार कोण असेल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. या अगोदरही असे कित्येक घटना घडले आहेत. जनावरांवर तर सोडा नागरिकांवर सुद्धा हल्ले झाले आहेत. (Loose Dogs) मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावावा म्हणून ग्रामपंचायतीला वारंवार सांगितले आहे. परंतु ग्रामपंचायत अशा घटना घडूनही कोणत्याही अॅक्शन मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे लवकरात लवकर जर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावल्या गेला नाही तर, अकास्मित घटना घडण्यासाठी वेळ लागणार नाही.
अनेकदा झाले आहेत हल्ले
ग्रामीण क्षेत्र असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचा जोडधंदा म्हणून गाय म्हशी पालन दूध उत्पादनातून घर खर्च चालत असतो. जनावरे बाहेर अंगणात बांधले असतात रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या समूह येऊन गाई म्हशींना चावा घेत असतात. कित्येकदा वासरांना मोकाट कुत्र्यांनी फोडले आहे. तेवढेच नाही तर लोकांवर सुद्धा हल्ले झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास फिरणार्या नागरिकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे.
भुंकण्याच्या आवाजाने होते झोपमोड
गावात अनेक वार्डात मोकाट कुत्र्यांचा जास्त प्रमाणात वावर असल्याने रात्रीच्या सुमारात हे (Loose Dogs) कुत्रे आपला समूह एकत्र करून जोरजोराने ओरडतात. त्यामुळे नागरिकांची झोप मधातच मोडत असते. नागरिक वारंवार कुत्र्यांना हाकलूनही ते जात नाही. याउलट मुजोरी करतात. त्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करायला हवा.
ग्रामपंचायतीला दिल्या आहेत सूचना
मागील कित्येक दिवसांपासून गावात मोकाट कुत्रे दिसत आहे. यापासून गावकरी असुरक्षित आहेत. ग्रामपंचायतीला (Loose Dogs) कुत्र्यांची विल्हेवाट लावावी म्हणून कित्येकदा सूचना दिल्या आहेत पण ग्रामपंचायत मात्र या सूचनेकडे काही लक्ष देताना दिसत नाही. ग्रामवासी भ्रमणध्वनीद्वारे नेहमीच ग्रामपंचायत कर्मचार्यांना सूचना देत असतात. पण अजूनपर्यंत ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. कित्येक घटना गावात घडले आहेत, यापुढे अजूनही काही मानवीय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल.
ग्रामपंचायतीने विशेष ठराव घेऊन नगरपालिकेला प्रस्ताव पाठविला असुन लवकरच पथक येऊन (Loose Dogs मोकाट कुत्र्यांची व्यवस्था लावण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सतर्कता घेवून काळजी घ्यावी.
-राहुल कारेमोरे, ग्रामपचायत अधिकारी धुसाळा