आँडीटविंग कर्मचारी व इतर सहकार क्षेत्रातुन कल्याणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव!
नांदेड (Madhavrao Kalyankar) : महाराष्ट्र स्टेट को-ऑप.डिपार्टमेंट ऑडिटर असोशिएशन, नागपूर जिल्हा नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी माधवराव नारायणराव कल्याणकर यांची नांदेड जिल्हा सहकारी खाते कर्मचारी (ऑडीट विंग) सहकारी पतपेढी (Cooperative Credit Bank) म.नांदेडच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा सहकारी खाते कर्मचारी (Audit Wing) सहकारी पतपेढी म.नांदेडच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष अध्यासी अधिकारी जी. यु. कुटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यात संस्थेच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अध्यक्ष, चेअरमनपदी (Chairman) माधवराव नारायणराव कल्याणकर यांची बिनविरोध निवड (Unopposed Election) करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर माधवराव कल्याणकर यांचे संस्थेचे राजेश्वर चरपिलवार उपाध्यक्ष, संतोष पोतदार कोषाध्यक्ष, शिवाजी कल्याणकर सचिव, बाळकृष्ण पोतदार, सुधाकर हंबर्डे, देवेद्र टाक, विलास कांबळे, बालाजी पवार, श्रीमती उज्वला लोहार व श्रीमती मायाराणी निलेवार या संचालकांसह श्रीकांत चौधरी जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ यांच्यासह आँडीटविंग कर्मचारी व इतर सहकार क्षेत्रातुन कल्याणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.