श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे मैदान खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सज्ज
जिल्हा परिषदेच्या अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांचा राहणार सहभाग
अमरावती (Sports Festival) : शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती तर्फे येथील विभागीय क्रीडा संकुलात १४ जानेवारीपासून १६ जानेवारी पर्यंत जिल्हा स्तरीय प्राथमिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे मैदानात करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात विविध समित्यांची नियोजन सभा रविवारला (ता.१२) संपन्न झाली.
जिल्हा परिषद अमरावती तर्फे दरवर्षी प्राथमिक शालेय (Sports Festival) क्रीडा महोत्सवाचे आयोजन हे केंद्र स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत केल्या जाते. या क्रीडा महोत्सवात अमरावती जिल्हातील १४ पंचायत समिती मधिल जवळपास अडीच हजार विद्यार्थी, मार्गदर्शक व खेळ प्रभारी शिक्षक उपस्थित राहणार आहे. क्रीडा व महोत्सव यशस्वी करण्याकरीता विविध समित्या तयार करण्यात आल्या आहे.
या (Sports Festival) क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे उपस्थित राहणार आहे.तर सोहळ्याचे अध्यक्ष पद अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे भुषवतील. विशेष अतिथी म्हणून वर्धेचे खासदार अमर काळे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, आमदार रवि राणा, आमदार सुलभा खोडखे, आमदार प्रताप अडसड, आमदार केवलराम काळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, आमदार गजानन लवटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक (भा.प्र.से) संजिता मोहपात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुळशीराम चव्हाण,सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसळे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अश्विनी मारणे, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड व आदी उपस्थित राहणार आहे.
अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे,प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर, क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी दिली. हा क्रीडा महोत्सव प्रामुख्याने दोन विभागामध्ये खेळला जाणार आहे.प्राथमिक विभागात इयत्ता पहिली ते पाचवी तर माध्यमिक विभागात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक विभागामध्ये प्रामुख्याने सांघीक व वैयक्तिक (Sports Festival) क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. तीन दिवसीय या क्रीडा महोत्सवाकरिता सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने करण्यात आली आहे. असे प्रसिध्दी समितीचे विनोद गाढे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
क्रीडा व (Sports Festival) महोत्सव यशस्वी करण्याकरीता विविध सोळा समित्या तयार करण्यात आल्या आहे. यात मुलींच्या निवास समितीच्या प्रमुख नांदगाव येथील गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे ह्या आहेत. मुलांच्या निवास समितीचे प्रमुख मोर्शी येथील गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट, नोंदणी समिती प्रमुख अंजनगाव येथील गटशिक्षणाधिकारी श्री.भ. गिरासे,प्रसिध्दी समिती प्रमुख वरूडचे गटशिक्षणाधिकारी विनोद गाढे, भोजन समितीचे प्रमुख चांदुर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, आरोग्य समितीचे प्रमुख दर्यापुरचे गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, कार्यालयीन समितीचे प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर, सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख भातकुलीचे गटशिक्षणाधिकारी दीपक कोकतरे व धामणगावच्या गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर हे आहेत.
स्वागत समिती प्रमुख तिवसाचे गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, बक्षिस वितरण समिती प्रमुख अमरावतीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे,पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे प्रमुख अचलपूरचे गटशिक्षणाधिकारी राम चौधरी, लेखा समिती प्रमुख लेखा अधीक्षक अश्विनी पवार, निर्णय समिती प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर मोहने, मैदान समिती प्रमुख चांदुर बाजारचे गटशिक्षणाधिकारी वकार अहमद, छायाचित्रण समिती प्रमुख चिखलदराचे
गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे, सनियंत्रण समितीचे प्रमुख प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे हे आहेत.
क्रीडा महोत्सवामध्ये (Sports Festival) प्राथमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी, खो-खो वैयक्तिक खेळ मध्ये लंगडी, ७५मी. धावणे, लांब व उंच उडी, दोरीवरील उड्या याचा समावेश असुन माध्यमिक विभागात सांघिक खेळात कबड्डी, खो-खो,व्हाॅलीबाॅल, टेनिक्वाइड, दुहेरी, बॅडमिंटनदुहेरी, १००x४रिले, वैयक्तीक खेळ मध्ये १००मी. धावणे, लांब व उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, टेनिक्वाइड मुली याचा समावेश आहे.