उमरखेड तालुक्यातील पूर परिस्थितीची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी
उमरखेड (Sanjay Rathod) : तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी आज २५ ऑगष्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल वर जाऊन केली. त्यांनी पूर पिडीतांचे सांत्वन करीत त्यांना शासन व राज्याचे मंत्रिमंडळ हे शेतकर्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्र सरकार नुकसानग्रस्तांना कोणालाही वार्यावर सोडणार आश्वासन दिले आहे . पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा हा उमरखेड तालुक्यातील घमापुर फाट्यावरून सुरू झाला. यावेळी घमापूर कुरळीच्या नागरिकांनी चक्क रस्त्यावरच पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी रस्त्यावर उभे राहून सर्वांचे प्रश्न ऐकले.
त्यांनी यावेळी गावकर्यांना सांगितले की ,शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .याचे सर्वेक्षण सुद्धा झाले असून आम्ही शेतीग्रस्त शेतकर्यांना दोन प्रकारची मदत देणार आहोत. शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले त्याचा वेगळा मोबदला व ज्यांची शेतीच खरडून गेली त्यांचाही सर्वे करून त्यांना वेगळा मोबदला देणार असल्याचे सांगितले. आम्ही सरकार म्हणून शेतकर्या सोबतच असल्याची खात्री पालकमंत्र्यांनी दिली.
घरे पाण्याखाली गेलेले तसेच क्षतीग्रस्त झालेले आहे,अशांना मदत देणार असल्याचे यावेळी सांगितले. कोरटा येथे पाहणी दरम्यान पूर आलेल्या नाल्याची पाहणी यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाण्याखाली आलेल्या घरांची पाहणी केली. या भागातील वीज संदर्भात असून या पुरामध्ये विज पुरवठा ही मागील पाच दिवसा पासून बंद आहे. विजेच्या खांबाला वेल्डींग करून मागील अनेक वर्षापासून खांबे उभी करण्यात आली आहे. ते खांब घरावर कोसळण्याच्या मार्गावर आहेत ते दुरुस्ती करा ! अशी मागणी गावकर्यांनी करताच, पालकमंत्री राठोड यांनी डोक्याला हात मारला. विजेचे खांब कुठे वेल्डींग करून उभे करण्यात येते का? असा संतप्त सवाल व्यक्त करून त्यांनी विज मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
पाहणीनंतर उमरखेड येथे नुकसानीचा आढावा
दोनही तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी (Sanjay Rathod) उमरखेड येथे नगर परिषद गार्डन हॉल सभागृहात नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. दोनही तालुक्यातील पुरपरिस्थीती व नुकसानीची माहिती त्यांनी घेतली.
नागरिकांनी सर्वेक्षणाच्या वेळी जागृत रहावे
नागरिकांनीही सर्वेक्षणात जागृत राहणे आवश्यक असून आपातग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. शेतीला किती मदत द्यायची ही भूमिका आपण कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या समोर मांडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. खरोखरच जे नुकसानग्रस्त आहे ते जर सर्वेक्षणातून सुटले असेल तर त्यांनी केवळ अर्ज करावा त्यांना मदत देण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगीतले.